आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणेंचा पत्ता अखेर कट; प्रसाद लाड भाजपचे उमेदवार; काँग्रेसकडून दिलीप माने यांचे नाव निश्चित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/ मुंबई- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाेटनिवडणुकीत भाजपतर्फे राणेंना उमेदवारी मिळणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच रविवारी स्पष्ट केले. ‘राणे हे एनडीएच्या घटक पक्षाचे सदस्य अाहेत. मात्र अाम्ही मित्रपक्षाचा नव्हे तर भाजपचाच उमेदवार या निवडणुकीत देणार अाहाेत. साेमवारी सकाळी त्याचे नाव अधिकृत जाहीर केले जाईल,’ असे दानवे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. दरम्यान, भाजपने प्रसाद लाड यांचे नाव जाहीर केले अाहे.


उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा साेमवारी अखेरचा दिवस अाहे. या पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या नावावर निर्णायक चर्चा करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची रविवारी दुसरी बैठक झाली. भाजपने राणेंना उमेदवारी दिल्यास कोकणातील राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांना उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसने केली अाहे. त्यासाठी रविवारी तातडीने त्यांना मुंबईत बोलावून घेण्यात अाले हाेते. मात्र भाजपकडून राणेंना उमेदवारी दिली जाणार नसल्याचे संकेत मिळाल्याबराेबर काँग्रेसने साेलापूर जिल्ह्यातील माजी अामदार दिलीप माने यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले अाहे. स्वत: माने यांनीही त्याला दुजाेरा दिला. दरम्यान,  आम्ही तिघांचे अर्ज तयार ठेवले असून तशी नावे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे पाठवली आहेत. तिघांपैकी एकाचे नाव निश्चित होईल, असे काँग्रेसच्या नेत्याने बैठकीनंतर सांगितले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, काय असेल शिवसेनेची भूमिका... 

बातम्या आणखी आहेत...