आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची सत्ता अाल्यापासून अल्पसंख्यकांवर अत्याचार वाढले, अजित पवारांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील भाजप सरकार हे जातीयवादी असून हे  सरकार सत्तेत आल्यापासून अल्पसंख्यकांवरील अत्याचाराच्या प्रमाणात माेठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे.  भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेली शिवसेना ही दुटप्पीपणाची भूमिका बजावत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.    
 
राष्ट्रवादीच्या वतीने सध्या संघटनात्मक पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईत आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपवर जातीयवादाचे आरोप करतानाच मराठी आणि धनगर समाजाला वचन देऊनही या सरकारने आरक्षण न दिल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. उत्तर प्रदेशात भगवे कपडे घालणाऱ्या योगी आदित्यनाथांनी सत्तेवर आल्यानंतर एका झटक्यात कर्जमाफी केली, पण जॅकेट घालणारे आपले मुख्यमंत्री अजून कर्जमाफीबाबत अभ्यासच करत आहेत. या सरकारने जीएसटी करप्रणाली लागू केली, पण त्यामुळे महागाई वाढली आहे. जीएसटीविरोधात गुजरातमधील व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत, तर जीएसटीमधून पेट्रोल वगळल्याने महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. त्यात सामान्य जनात होरपळून निघत असल्याबाबत त्यांनी सरकारचा निषेध केला.    
 
झाडे लावा, पण ती जगवाही..!  
राज्य सरकारने नुकताच महाराष्ट्रभर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला.या मोहिमेवरही अजित पवार यांनी मेळाव्यात सडकून टीका केली. ‘भाजपचे सरकार फक्त झाडे लावत अाहे. राज्यात चार कोटी वृक्ष लागवड केली असल्याचे भाजपचे नेते आणि मंत्री सर्वत्र सांगत आहेत. पण त्यांनी लावलेली झाडे जगतील की नाही याबाबत आपल्याला शंका आहे. झाडे लावताना शिवसेना आणि भाजप जवळ येतात, पण प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात पाहतात, असा टाेलाही अजित पवार यांनी लगावला. सरकारच्या शेतकरीविराेधी धाेरणावरही त्यांनी टीका केली.
बातम्या आणखी आहेत...