आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकिट वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रसचे कार्यकर्ते मुंबईत उतरले हमरी-तुमरीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महापालिका निवडणुकीची तारीखही जाहीर झाली नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र त्याच पक्षात अाता तिकिट वाटपावरून वादंग निर्माण झाला आहे. दिंडोशी विधानसभा मतदार संघातील सात प्रभागामध्ये तिकीट वाटपावरून उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अजित रावराणे व  माजी आमदार विद्या चव्हाण यांच्या समर्थकात  पक्ष मुख्यालयातच घोषणाबाजी रंगली आणि कार्यकर्ते हमरी-तुमरीवर आले.  
 
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर दुसरी यादी जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. दुसऱ्या यादीत दिंडोशी मतदारसंघातील सात प्रभागांचा विचार केला जाणार होता. जिल्हाध्यक्ष अजित रावराणे हे दुसऱ्या यादीत आपल्या समर्थकांची वर्णी लावणार याची माहिती मिळताच आमदार विद्या चव्हाण यांचे समर्थक संतापले. गुरुवारी नरीमन पॉईंट येथील पक्ष कार्यालयासमोर विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अजित रावराणे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. रावराणे यांनी शिवसेनेशी संगनमत केल्याने महापालिका निवडणुकीत पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात यावे अशी मागणीही या कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी भवन या कार्यालयासमोरच हा गोंधळ झाल्याने दुसरी यादी जाहीर होण्यापूर्वीच पक्षातील फूट समोर आली आहे. गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार होती. याआधीच राष्ट्रवादी भवनवर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत नवा वाद उभा केल्याने पक्षातील फूट समोर आल्याचे स्पष्ट झाले. 
 
वादाच दुसरा अंक 
गोवंडी येथे संजय दिना पाटील व नवाब मलिक या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद गाजला होता. त्यानंता आता तिकिट वाटपावरून जिल्हाध्यक्ष अजित रावराणे आणि आमदार विद्या चव्हाण समर्थक भिडले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षातीलच हा दुसरा वाद समोर आला आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, अाम्हालाही वाटा हवा... 
बातम्या आणखी आहेत...