आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये गुन्हेगारांना राजाश्रय, शिवसेना अामदार नीलम गाेऱ्हे यांचा अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘निवडणुकीच्या काळात गोंधळ घालण्यासाठी गृह विभागाकडून गुन्हेगारांना पॅरोलवर सोडले जाते. पुणे, कोल्हापूर येथे अशा घटना उघडकीस आल्या होत्या. निवडणुक काळापुरता पॅरोल घेऊन हे गुन्हेगार पुन्हा जेलमध्ये जातात. भाजपकडून अशा गुन्हेगारांना राजाश्रय दिला जात अाहे,’ असा आरोप शिवसेनेच्या नेत्या अामदार नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

‘निवडणूक आयोग प्रचाराच्या काळात व्हीडिअाे शूटिंग करीत असते. मात्र कधीकधी काही पक्षांना फायदा पोहोचवण्यासाठी काही प्रसंगाचे मुद्दाम चित्रीकरण केले जात नाही. पुणे, कोल्हापूर येथे याचा अनुभव आलेला आहे,’ याकडेही गाेऱ्हे यांनी लक्ष वेधले.

‘भाजपात स्वच्छ चारित्र्याचे नेते असल्याचे म्हटले जाते. परंतु शिवसेनेने नुकतीच भाजपातील गुन्हेगारांची यादी व्हॉट्सअपवर सादर केलेली आहे. पुण्यात पिंट्या जाणवे, नाशिकमध्ये अर्जुन पगारे, पवार या गुंडांना भाजपाने पक्षात प्रवेश दिला आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपरणे देऊन त्यांना भाजपात घेत आहेत,’ असा अाराेपही त्यांनी केला.

मैथिली जावकर प्रकरणात नक्की काय झाले याची माहिती मिळणे आवश्यक असून त्यांनी गणेश पांडे यांच्या विरोधातील तक्रार मागे का घेतली, त्यांच्यावर कसला दबाव आला? असा प्रश्न करून गाेऱ्हे म्हणाल्या, ‘या प्रकरणात एका मंत्र्याचेही नाव होते. गणेश पांडे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून अहवाल मागवू असे आश्वासन सभागृहात दिले होते. मात्र सहा महिने झाले तरी काहीही झालेले नाही. गणेश पांडे हा आशिष शेलार यांचा निकटवर्तीय असल्याने कारवाई होत नाही का? या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि उच्च न्यायालयाने स्वतः दखल घ्यावी,’ अशी मागणीही त्यांनी केली.
राणेंनी साेडले पिल्लू
नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाबाबत न्यायालयातील कामकाजाची चुकीची माहिती दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांवर अविश्वास ठराव आणणार असल्याचे म्हटले अाहे. त्याबाबत गाेऱ्हे म्हणाल्या, ‘राणे यांनी अविश्वास ठरावाचे पिल्लू सोडले आहे. या ठरावाला खूप कालावधी जातो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाचे मंत्री, आमदारांची बैठक बोलावली असून त्यात ठाकरे स्वतःच निर्णय घेतील. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देता कि जाता नारा दिल्यानंतर नारायण राणे यांच्याकडून किमान एवढे करणे तरी अपेक्षित आहे,’ असेही त्या म्हणाल्या. मराठा अारक्षणाबाबत मंत्री राजकुमार बडाेले यांनी वादग्रस्त वक्तव्य करायला नकाे हाेते, असेही त्या म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...