आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सिद्धार्थ’चे धडे घेऊन गेले मंत्रिपदापर्यंत, केंद्रीय मंत्रिमंडळात दाेन चेहरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दलित चळवळीतले अनेक म्हाेरके वडाळ्याच्या सिद्धार्थ हाेस्टेलने घडवले. त्यातल्या कुणी साहित्यात, कुणी चळवळीत, तर कुणी शैक्षणिक क्षेत्रात नाव कमावले. त्यापैकीच शिक्षणात गती कमी असलेला, शांत स्वभावाचा, वळणदार अक्षर असलेला सांगली िजल्ह्यातला रामदास बंडू आठवले नावाचा लाजाळू पोरका पोरगा होता. सिद्धार्थमध्ये त्यानं चळवळ अन् संघटनेचं बाळकडू घेतलं. त्या पुंजीवर सुरू केलेला प्रवास आज त्याला केंद्रीय मंत्रिपदापर्यंत घेऊन गेला.

१९७१ मध्ये ‘एफवाय’ला आठवले यांनी सिद्धार्थमध्ये प्रवेश घेतला अाणि ते ‘सिद्धार्थ’वर राहायला आले. भांडुपला त्यांचे चुलते होते. त्या वेळी पँथरची चळवळ भरात होती. राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, अविनाश महातेकर असा तो कंपू होता. आठवले पँथरचे मुंबई सेक्रेटरी बनले तरी त्यांच्याकडे काम मात्र हरकाम्याचे असायचे. सिद्धार्थच्या कट्ट्यावरील बौद्धिक चर्चांत आठवलेंना रुची नव्हती. गावाकडून आलेल्यांना मंत्रालयात पोहोचवणे, त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे, संघटनेची पत्रके प्रेसमध्ये पोहोचवणे यातच ते पुढे असायचे. १९७७ मध्ये पँथर बरखास्त झाली. आठवले हे ढाले गटात गेले. या गटाने मास मूव्हमेंट संघटना काढली. पुढे ढाले यांनी तीसुद्धा बरखास्त केली. अाठवले अाणि अरुण कांबळे यांनी भारतीय दलित पँथर या संघटनेची स्थापना केली. मराठवाडा िवद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न पुढे पेटला. त्यात आठवले यांचे नेतृत्व पुढे आले. ते त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिपदापर्यंत घेऊन गेले.

सिद्धार्थमधील ५० नंबरची खोली अाणि आठवले, असे समीकरण झाले होते. २०१५ मध्ये सिद्धार्थ पालिकेने पाडून टाकले. तोपर्यंत ती ‘साहेबांची खाेली’ म्हणून ओळखली जायची. शरद पवारांनी १९९० मध्ये आठवले यांना राज्यात मंत्री केले, तेव्हाही आठवले याच ५० नंबरच्या खोलीतून मंत्रिपदाची शपथ घ्यायला गेले हाेते.

सिद्धार्थचे हजारो हाेस्टेलियर होते, पैकी आठवले यांची राजकीय कारकीर्द चमकदार ठरली. त्याचं कारण त्यांचा स्वभाव. संपर्क ठेवण्यात आठवले यांंचा हात कुणी धरू शकणार नाही. पँथरची संस्थापक मंडळी पुढे आपापल्या कामधंद्यास लागली. मात्र आठवले ते आणि तेच करत राहिले. संघटक म्हणून दुसरा त्यांचा गुण म्हणजे त्यांची िफरस्ती. त्यातून त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. कार्यकर्ते गोळा होत गेले. त्यांच्या पाठिंब्यावर राजकारण करत राहिले. तेच आज आठवले यांच्या कामी आलं आणि ते त्यांना केंद्रीय मंत्रिपदी बसवूनही गेलं.

‘साहेबांचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न साकार झालं,’ अशा प्रतिक्रिया व्यक्त करत रिपाइं कार्यकर्त्यांनी मुंबईत जल्लाेष केला.

कवितेचे वेड विद्यार्थिदशेपासूनच
‘चाराेळी’कार म्हणून लाेकप्रिय असलेल्या खासदार अाठवलेंचा कविता करण्याचा विद्यार्थिदशेपासूनच छंद अाहे. आठवले ‘सिद्धार्थ’वर असतानाही कविता करायचे. लाजाळू स्वभाव असल्याने ते दाखवायचे मात्र नाहीत. त्यांची पहिली कविता ‘अस्मितादर्श’ मासिकात छापून आली होती. तिचे नाव होते ‘गडगडत जाणारा दगड’. त्यावरून सहकारी त्यांना तू गडगडणारा दगडच आहेस, असेही टोकायचे.
पुढे वाचा, विजय दर्डा घर साेडेपर्यंत मंत्री अाठवले ‘बेघरच’!
काय म्हणाले मंत्री भामरेंचे वडील आणि पत्नी..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...