आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज शपथविधी : मराठवाड्यातून निलंगेकर, खोतकर राज्य मंत्रिमंडळात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर दोनच दिवसांनी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मराठवाड्यातून लातूर जिल्ह्यातील भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर हे मंत्रिपदाची शपथ घेतील.
विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शुक्रवारी सकाळी ९ वाजता भाजपचे ६, मित्रपक्षांचे २ मंत्री शपथ घेतील.आहेत. प्रा. राम शिंदे आणि डॉ. रणजित पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदी पदोन्नती दिली जाण्याची शक्यता आहे.

भाजपने बुलडाण्याचे पांडुरंग फुंडकर, िंशंदखेडचे जयकुमार रावल, यवतमाळचे मदन येरावार, लातूरचे संभाजी पाटील िनलंगेकर, सोलापूरचे सुभाष देशमुख, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण यांची नावे निश्चित समजली जात आहेत. फुंडकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून माजी खासदार व िवधान परिषदेचे माजी िवरोधी पक्षनेते आहेत. फुंडकर यांना कॅबिनेटपद मिळणे निश्चित आहे. त्यांच्याकडे कृषिमंत्रीपद दिले जाईल, असे बोलले जाते. बुधवारपर्यंत देवयानी फरांदे व िस्मता वाघ यांची नावे पुढे होती, पण गुरुवारी ती मागे पडून मदन येरावार, संभाजी िनलंगेकर, सुभाष देशमुख, रवींद्र चव्हाण ही नावे पुढे आली. वीस महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारमध्ये सध्या १९ कॅबिनेट व १० राज्यमंत्री आहेत.
कॅबिनेटचा माेह शिवसेनेने साेडला
भाजपला पाठिंबा देतानाच्या करारानुसार भाजपने शिवसेनेला दोन राज्यमंत्रिपदे दिली. शिवसेनेने गुलाबराव पाटील व अर्जुन खोतकरांची नावे निश्चित केली. कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी शिवसेनेच्या एका गटाची मागणी होती, त्यासाठीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करीत होते, परंतु लिखित करारानुसार कॅबिनेट देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने दोन राज्यमंत्रिपदांवर शिवसेना सहमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खातेपालट व बढत्या : पाटलांकडे महसूल
> मुख्यमंत्र्यांचे डावे हात समजले जाणारे आणि नगरविकास व गृह खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना बढती मिळणार असून त्यांना वैद्यकीय व उच्च शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल. त्यांच्याकडील खाती जयकुमार रावळ
यांना मिळतील, असे कळते.
> गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनाही कॅबिनेटपदी बढती देऊन त्यांना चंद्रकांत पाटलांकडील सार्वजनिक बांधकाम खाते मिळेल. त्यांचे खाते राज्यमंत्री मदन येरावार यांना, पाटलांना महसूल खाते तर उत्पादन शुल्क खाते मुनगंटीवारांना मिळण्याची शक्यता आहे.

जानकरांच्या कॅबिनेटसाठी पंकजा मुंडे यांचा रेटा
भाजप िमत्रपक्षांच्या महादेव जानकर व सदाभाऊ खोतांची नावे िनश्चित आहेत. जानकर हे कॅबिनेटपदासाठी अडून बसले असले आहेत. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा जानकर यांना कॅबिनेटपद द्या, असा आग्रह असून त्याला फडणवीस मंजुरी देतात का, याकडे आता लक्ष लागले आहे. खोत यांना राज्यमंत्रिपद दिले जाईल.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...