आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजांचे जलसंधारण, तावडेंचे वैद्यकीय शिक्षण खाते काढले, वाचा यामागचे राजकारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारानंतर या नव्या मंत्र्यांचे खातेवाटप शनिवारी जाहीर करण्यात आले. यानुसार, मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे खाते म्हणून ओळखले जाणारे महत्त्वाचे महसूल खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

यापूर्वी हे खाते मावळते मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे होते. या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व वाढले आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्याकडे असलेले अतिशय महत्त्वाचे जलसंधारण खाते कॅबिनेटपदी बढती देण्यात आलेले राम शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे अपेक्षेनुसार कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून सुभाष देशमुखांकडे सहकारसारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात
आली आहे.

मराठवाड्यातील संभाजी पाटील निलंगेकर आणि अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी अनुक्रमे कॅबिनेट व राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यात निलंगेकर यांना कामगार कल्याण खाते सोपवण्यात आले. तर, खोतकरांना वस्राेद्याेग, पशु व दुग्ध खात्याचा कार्यभार सोपवला अाहे.

जयकुमार रावल यांना पंकजा मुंडे यांच्याकडे असलेले राेजगार हमी हे खाते देण्यात अाले असून विनाेद तावडेंकडील पर्यटन खातेही त्यांना मिळाले अाहे. दीपक केसरकर यांना गृह (शहर) व कारागृह खात्याची जबाबदारी साेपवण्यात अाली असून रवींद्र चव्हाण यांना बंदरे, अाराेग्य खाते देण्यात अाले अाहे.

विनाेद तावडे यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण हे खाते अाता गिरीश महाजन यांच्याकडे साेपवण्यात अाले अाहे. राज्यमंत्री सदाशिव खाेत यांना कृषि अाणि पणन खात्याची जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. कॅबिनेटमंत्री महादेव जानकरांकडे पशू अाणि दुग्ध व्यवसाय देण्यात अाले अाहे. एकनाथ खडसे यांच्याकडे असलेले अल्पसंख्याक खाते विनाेद तावडे यांना देण्यात अाले अाहे.
राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना सहकार खाते मिळाले अाहे.
असे आहे यामागे राजकारण
आधी एकनाथ खडसे, नंतर पंकजा मुंडे आणि विनोद तावडे. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय फलंदाजीला सुरवात केल्याचे दिसून येत आहे. शपथविधी समारंभात दोन कॅबिनेट मंत्र्यांनी गोपिनाथ मुंडे यांचे नाव घेतले होते. यावरुन त्यांचा कुणाला पाठिंबा मिळेल हे जवळपास स्पष्ट होते. त्यामुळे पंकजा यांचे पंख कापण्यात आले आहेत. दुसरीकडे तावडे यांचीही गेल्या काही दिवसांपासून राजकीय चळवळ वाढली होती. त्यांना शह देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजालाही एक मेसेज दिला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, काय भोवले मुंडे, तावडेंना.. कसे आहे नवे खातेवाटप....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...