आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक गाव, एक विद्युत व्यवस्थापक, सरकारची नवी याेजना, २३ हजार तरुणांना रोजगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ग्रामीण भागामध्ये विद्युत पुरवठ्याच्या सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक’ ही योजना अमलात अाणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. तसेच ग्रामपंचायतींनी फ्रँचायझीप्रमाणे काम करण्याबाबत ऊर्जा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावालाही राज्य सरकारने मंजुरी िदली आहे. या नव्या योजनेमुळे ग्रामीण भागातील अायटीअायधारक २३ हजार तरुणांना राेजगाराची संधी िमळणार आहे. या विद्युत व्यवस्थापकांना नऊ हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल. ‘दिव्य मराठी’ने एक अाठवड्यापूर्वीच ही याेजना येणार असल्याचे वृत्त दिले हाेते.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत हा िनर्णय जाहीर केला. फ्रँचायझी म्हणून मीटर रीडिंग घेणे, वीज देयकांचे वाटप करणे, ब्रेकडाऊन अटेंड करणे, वीजपुरवठा पूर्ववत करणे, डीओ फ्यूज टाकणे, फ्यूज कॉल तक्रारी अटेंड करणे, रस्त्यावरील पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती किंवा बदली करणे, नवीन जोडणीची कामे करणे, थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करणे ही कामे िवद्युत व्यवस्थापक करणार आहेत. या कामांकरिता प्रती वीज ग्राहक ९ रुपये शुल्क ग्रामपंचायतींना देण्यात येईल. ग्राम विद्युत व्यवस्थापकास प्रती ग्राहक ९ रुपयेप्रमाणे प्राप्त होणारे उत्पन्न किंवा ३ हजार रुपये यापैकी जे अधिक असेल ते महावितरणतर्फे देण्यात येईल. तर उर्वरित सहा हजार रुपये वेतन सरकार देईल. हे पद कंत्राटी असेल. ही योजना राज्यातील ३ हजार लोकसंख्येपर्यंतच्या २३ हजार ६१७ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येईल. त्यासाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय २५०० विद्युत उपकेंद्र सहायक तर ३ हजार विद्युत सेवकांच्या नेमणुका डिसेंबरपर्यंत हाेणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

विद्युत व्यवस्थापकास विमाछत्रही
¾ग्राम विद्युत व्यवस्थापकाने करावयाच्या कामांमधील जोखीम विचारात घेता त्याचे विमा संरक्षण योजना महावितरण कंपनी तयार करेल किंवा त्यापोटी ठरावीक रक्कम वार्षिक प्रीमियमसाठी देईल. ग्राम विद्युत व्यवस्थापकास प्रस्तावित कामे करण्याकरिता आवश्यक असणारी साधनसामग्री महावितरण कंपनीमार्फत अग्रीम रक्कम किंवा साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच व्यवस्थापकांना तीन महिन्याचे प्रशिक्षणही दिले जाईल.
¾ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याकरिता ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. सदर जाहिरात ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात येईल. व्यवस्थापक म्हणून नेमणुकीकरिता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेच्या आधारे (आयटीआयचे गुण) निवड करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...