आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : सेल्फी पॉईंटवर या आणि ऐतिहासिक इमारती मोबाईलमध्ये क्लिक करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येथील ब्रिटिशकालीन इमारती नेहमीच भुरळ घालत असतात. विशेष करून परदेशी पर्यटकांमध्ये या इमारतीबद्दल जास्त आकर्षण असते. मुंबई महानगरपालिका आणि सीएसटी स्थानाकासमोर रस्त्यावर उभे राहून लोक या इमारतीची छायाचित्रे काढतात. आता पर्यटकबरोबरच बरोबरच हौशी छायाचित्रकारांना सेल्फी पॉईंटची नवी भेट मिळाली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सेल्फी पॉइंटचे उद्घाटन केले. 
 
छत्रपती शिवाजी टर्मिनस व महापालिका मुख्यालय इमारत या दोन्ही ऐतिहासीक इमारती परिसरात पर्यटकांना सेल्फी काढता यावी यासाठी स्वतंत्रपणे सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. सुमारे 80 लाख रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या सेल्फी पॉईंट मुळे पर्यटकांना फोटो काढण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे. 
 
संपूर्ण इमारतीसह आपला सेल्फी टिपण्यासाठी भर रस्त्यात उभ राहून पर्यटक सेल्फी काढीत असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन पर्यटकांच्या जिविताला धोका होऊ शकतो. हे लक्षात घेऊन महापालिकेने सीएसटी सब वेच्या बाजूला हा सेल्फी पॉईंट उभारला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...