आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवजात बाळांना जुलैपासून ‘आधार’, सरकारी रुग्णालयांना 500 टॅब्लेट देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - नवजात बाळांच्या आधार नोंदणीसाठी राज्य सरकारतर्फे ग्रामीण, जिल्हा रुग्णालयांना टॅब देण्यात येणार असून नवजात अर्भकाला लगेचच आधार क्रमांक देण्याचे काम जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आयटी सचिव विजय कुमार गौतम यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. तसेच राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आधारशी संलग्न बँक खात्यात यंदापासून जमा होणार असल्याने ३ हजार कोटी रुपये वाचणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, राज्यातील ९४.५४ टक्के आधार नोंदणी पूर्ण झाली आहे.   

गौतम म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात १०० टक्के आधार नोंदणी पूर्ण झाली असून ७५ लाख नागरिकांची नोंदणी बाकी आहे. नवजात अर्भकांना त्वरित आधार क्रमांक देण्याची योजना राज्य सरकारने आखली असून ३५८ तालुका आणि जिल्हा रुग्णालयांना यासाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेले टॅब देण्यात येणार आहेत. ३४ जिल्हा रुग्णालये आणि १०० सुपर स्पेशालिटी रुग्णालयांना टॅब दिले जाणार आहेत. बाळ जन्मल्याबरोबर त्याचा व माता-पित्यांपैकी एकाचा फोटो काढून त्याला आधार क्रमांक दिला जाईल. त्यानंतर १४ वर्षांनंतर त्याच्या हाताचे ठसे घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.  
 
अंगणवाड्यांनाही टॅब : दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व अंगणवाड्यांना ३३०० टॅब आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात २६०० महसूल केंद्रांवर ३९०० टॅब दिले जातील. तालुकास्तरावर दहा-दहा शाळांची यादी तयार करून वर्षातून दोन वेळा आधार नोंदणी कॅम्प घेतलेजातील. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी  ३०० योजना आहेत. त्यापैकी ३२ योजना आधारसंलग्न बँक खात्यात थेट पैसे देण्यासाठी निवडल्या आहेत. याचा ५० लाख विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार असून यामुळे राज्याचे  ३ हजार कोटी रुपये वाचणार आहेत. 
 
राज्यातील आधार नोंदणी : औरंगाबाद- ९५.९२ टक्के , नाशिक- ९५.०७ टक्के , सोलापूर- ९३.०४ टक्के , जळगाव- ९५.८४ टक्के, अहमदनगर- ९६.७७ टक्के , अमरावती- ९५.३६ टक्के.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...