आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझर्व्ह बँकेकडून शंभराच्या नवीन नोटा चलनात येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच १०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. महात्मा गांधीजींच्या सिरीज-२००५ सारख्याच या नोटा असतील, असे रिझर्व्ह बँकेने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवर इनसेट लेटरमध्ये आर लिहिलेले असेल. या नोटांवर सध्याचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी असणार आहे.

१०० रुपयांच्या नवीन नोटांवर २०१७ असा उल्लेख असणार आहे. नवीन नोटा जुन्या शंभरांच्या नोटांप्रमाणे असतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. नवीन नोटांच्या नंबर पॅनलवर चढत्या क्रमाने अंक असतील. नवीन नोटा चलनात आल्या तरीही जुन्या नोटाही वैध असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ५० आणि २० रुपयांच्याही नवीन नोटा चलनात आणण्याच्या विचारात आहे. नवीन नोटा आल्या तरी जुन्या नोटाही चलनात राहतील. दरम्यान, पाचशे आणि एक हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर शंभर आणि पन्नासच्या नोटांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला होता. एटीएम आणि बँकांमध्येही नोटा मिळत नसल्याने देशातील ग्रामीण भागांमध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.  
बातम्या आणखी आहेत...