आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वागळे हिटलिस्टवर; संरक्षण नाकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील समीर गायकवाडने सनातन संस्थेच्या हिटलिस्टवर आता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे असल्याचेतपास यंत्रणांना सांगितल्याची माहिती अाहे. यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी वागळे यांना संरक्षण पुरविण्याची तयारी दाखवली मात्र वागळे यांनी त्यास नकार दिला. समीरच्या फोन कॉल्सची तपासणी करण्यात आली. पानसरे यांच्या हत्येनंतर त्याने सहकाऱ्यांसोबत केलेल्या संभाषणात अनेक वेळा वागळे यांचे नाव उच्चारले गेल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मुंबईतील पत्रकार व किर्तनकार शामसुंदर सोन्नर यांना सनातन प्रभातच्या ११ सप्टेंबरच्या अंकात धर्मद्रोही घोषित केले. सोन्नर यांनी लातुरातील किर्तनात संतांच्या शिकवणीत विज्ञानवाद कसा आहे आणि संतांनी फालतू कर्मकांडांना विरोध कसा केला आहे, हे मांडले होते.