आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त तूरडाळीचा अाता हाेणार लिलाव, भाव कमी होण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जप्त केलेल्या १३ हजार टन तूर डाळीचा साठा वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याऐवजी त्याचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे बाजारात डाळींचे भाव कमी होण्यास मदत होईल. साठेबाजी करून सरकारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कडक धोरण स्वीकारले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या डाळींच्या साठ्यापैकी फक्त तूर डाळीच्या साठ्याची विक्री करण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांकडून बाँड लिहून घेऊन हा साठा परत करावा, अशी सूचना सरकारने ५ नोव्हेंबरच्या आदेशानुसार केली होती. मात्र, व्यापाऱ्यांच्या संघटनेने त्याबद्दल असमर्थता दाखवत हा साठा वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याची मागणी केली होती. ती सरकारने फेटाळली असून जप्त डाळींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिला होता आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली.