आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचा जवान चंदू चव्हाणला मुक्त करण्यास पाक तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या वर्षी चुकून सीमा ओलांडून पाक हद्दीत प्रवेश केलेला भारतीय जवान चंदू चव्हाणची सुटका करण्याचे आश्वासन पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गुरुवारी दिली.  

दक्षिण मुंबईतील माझगाव डॉक लिमिटेडमध्ये स्कॉर्पियन श्रेणीतील दुसऱ्या ‘खान्देरी’ पाणबुडीचे जलावतरण केल्यानंतर भामरे म्हणाले की, चंदू चव्हाण जिवंत आहे, असे पाकिस्तानने मान्य केले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर त्याची सुटका केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. चंदूची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. लष्करी मोहिमांच्या महासंचालकांच्या (डीजीएमओ) पातळीवर चंदू चव्हाणच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. 
आजवर भारताच्या डीजीएमओंनी पाकिस्तानी डीजीएमओसोबत किमान १५-२० वेळा  बोलणी केली आहे. ताजी बोलणी नुकतीच झाली आहे. चौकशी पूर्ण होत आहेे आणि लवकरच चंदू चव्हाणची सुटका केली जाईल, असे आश्वासन पाकिस्तानी डीजीएमओंनी दिले आहे. विशेष म्हणजे चंदू चव्हाण हा भामरे  खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघातील रहिवासी आहे. चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांच्या आपण नियमित संपर्कात असल्याचेही भामरे म्हणाले. मागील वर्षी ३० सप्टेंबर रोजी नजर चुकीने चंदू चव्हाण  प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत गेला  होता. प्रारंभी पाकिस्तानने चंदू चव्हाणवर हेरगिरी केल्याचा ठपका ठेवला होता. मात्र चौकशीत त्याने अनवधानानेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडल्याचे लक्षात आले आहे.