आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त, स्टेट स्पेसिफिक सरचार्ज रद्द केल्याचा परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने महाराष्ट्रातील इंधनावरचा स्टेट स्पेसिफिक सरचार्ज रद्द केला आहे. यामुळे राज्यात पेट्रोल ६७ पैसे ते १.७७ रुपये आणि  डिझेल १.२५ ते १.६६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी ही माहिती दिली.

महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत तेल कंपन्यांच्या दोन रिफायनरी आहेत. त्यात आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर मुंबई महानगरपालिका वार्षिक सुमारे ३००० कोटींची जकात वसूल करत होती. या वसुलीपोटी महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व इतर पेट्रोलियम पदार्थांवर तेल कंपन्या राज्य विशेष कर (स्टेट स्पेसिफिक सरचार्ज) लावत होत्या.
बातम्या आणखी आहेत...