आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पाेलिसांचा भ्रष्टाचार रोखण्यास काय केले?, मुंबई उच्च न्यायालयाचा पोलिस खात्याला सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - वाहतूक पोलिसाच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा करणारा पोलिस विभागाचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. उलट वाहतूक शाखेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्वरित यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय पावले उचलली याबाबत वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांना तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.    
 
वाहतूक नियंत्रण शाखेचे हेड कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी जानेवारी मध्ये अापल्याच खात्यातील भ्रष्टाचाराबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. वरिष्ठांच्या भ्रष्टाचारात सामील होण्यास नकार दिल्याने आपला छळ होत असल्याचा आरोप करत टोके यांंनी भ्रष्टाचाराचे रेटकार्डच न्यायालयात सादर केले होते. या आराेपानंतर न्यायालयाने मुंबई पोलिस विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, टोकेंच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांनी दिला होता.  न्यायालयाने हा अहवाल फेटाळून लावत, वाहतूक पोलिसांबाबत खुद्द आपलाच अनुभव वाईट असल्याचे मत नोंदवले. तसेच महिला वाहनचालकांशी वाहतूक पोलिस कशा पद्धतीने अरेरावीने बोलतात, याची आपल्याला कल्पना असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले अाहे.  
बातम्या आणखी आहेत...