आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : शिवसेनेतर्फे महाडेश्वर यांनी महापौर, तर वरळीकर यांनी उपमहापौर पदासाठी भरले अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार. - Divya Marathi
शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार.
मुंबई - मुंबईत कोणाचा महापौर बसणार याचा निर्णय ८ तारखेला होणार असला तरी त्यासाठीच्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करावे लागणार असल्याने कोण कोण निवडणूक रिंगणार असेल हे चित्र स्पष्ट होणार आहे. आज सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
 
MUMBAI UPDATES
- काँग्रेसकडून महापौर पदासाठी विठ्ठल लोकरे यांचा अर्ज. 
- महाडेश्वर आणि वरळीकर यांनी अर्ज दाखल केले.
- शिवसेनेचे उमेदवार महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करणार. 
- शिवसेनेचे आमदार अनिल परबही महापालिकेत दाखल.
- शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार महापालिकेत दाखल. 
- हेमांगी वरळीकर वॉर्ड क्रमांक 193 मधून निवडून आल्या आहेत. 
- शिवसेनेतर्फे उपमहापौर पदासाठी हेमांगी वरळीकर यांचे नाव निश्चित
- महाडेश्वर तिसऱ्यांदा नगरसेवक, शिक्षण समितीचे अध्यक्ष पद, स्थायी समितीचे सभासद राहिलेले आहेत. 
- महाडेश्वर कॉलेजचे प्राध्यापक असून अनिल परब यांचे नीकटवर्तीय असल्याची माहिती आहे. 
- विश्वनाथ महाडेश्वर वांद्रे पूर्वमधील वॉर्ड क्रमांक 87 मधील नगरसेवक. 
- मातोश्रीवर झालेल्या बैठकीत महाडेश्वर यांचे नाव निश्चित
- शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाला हिरवा कंदील.
- उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या बैठकीला सुरुवात. 
- मनोहर जोशी, दिवाकर रावते, सुभाष देसाई, गजानन किर्तीकर अशा ज्येष्ठ नेत्यांची बैठकीला उपस्थिती. 
- मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक सुरू.
 
मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपने मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी चाचपणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. भाजप इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात मनसेने आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत, महापौर पदाच्या निवडणुकीची रंगत आणि शिवसेनेची चिंताही वाढवली आहे. 
 
भाजपच्या वतीने महापौर पदासाठी शैलजा गिरकर यांचे नाव पुढे येत असल्याची माहिती मिळाली आहे. तर शिवसेनेकडून  विशाखा राऊत यांचे नाव महापौर पदासाठी आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. 

मनसे किंगमेकर? 
सध्या शिवसेनेला 89 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याने शिवसेनेचे पारडे जड वाटत असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी मनसे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. मनसेचे सात नगरसेवक असल्याने मनसे कोणाला पाठिंबा देणार याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहे. दरम्यान मनसे भाजपवला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्या तरी मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मात्र मनसे कोणाच्याही दावणीला बांधलेला नाही, त्यामुळे मनसेसमोर सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मनसे खरंच भाजपला पाठिंबा देणार की दुसरी काही भूमिका घेणार याकडे आता शिवसेनेसह सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

एमआयएम भाजपच्या पाठिशी?
एमआयएमचे दोन नगरसेवकही भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसे झाल्यास भाजपचे संख्याबळ आणखी पुढे जाणार आहे. तसेच भाजप इतरही सर्वपक्षीय नरसेवकांच्या संपर्कात असून आणखी कोणाचा पाठिंबा मिळू शकेल याची चाचपणी करत आहे, त्यामुळे मुंबईतील महापौरपदाची निवडणूक चांगलीच रंगतदान होणार हे स्पष्ट आहे. 

काँग्रेस स्वतंत्र उमेदवार देणार?
दरम्यान, काँग्रेसनेही महापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे काँग्रेस कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसने पाठिंब्यासाठी फोन केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची मते काँग्रेसच्या उमेदवाराला गेली तर मनसे आणि इतर पक्षीय नगरसेवकच किंगमेकर असतील अशी सध्या तरी शक्यता आहे. 
 
पुढे वाचा, गीता गवळींचा भाजपला पाठिंबा..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...