आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: कॉंग्रेस NCP- प्रकाश मेहतांंची हकालपट्टी करा, मेहता म्हणाले- माफ करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाड/ मुंबई- महाडमधील दुर्घटनेसंदर्भात पालकमंत्री प्रकाश मेहता यांना प्रश्‍न विचारण्‍यासाठी गेलेल्‍या एका वृत्‍त वाहिनीच्‍या पत्रकाराला त्‍यांनी दमदाटी केली. मेहता यांचे कार्यकर्तेही पत्रकाराच्या अंगावर धावून गेले. मिलिंद तांबे असे या पत्रकाराचे नाव आहे. मृतांच्‍या नातेवाईकांबाबत तांबे यांनी पालकमंत्री मेहता यांना प्रश्‍न विचारला होता. त्यावर मेहता लगेच चिडले.
काय म्‍हणाले पालकमंत्री..
पत्रकार मिलींद तांबे यांनी पालकमंत्री प्रकाश मेहता यांना प्रश्‍न विचारताच ते चांगलेच भडकले. त्‍यांचे कार्यकर्ते तांबे यांच्‍या अंगावर धाऊन आले. तुम्‍हाला काय माहिती आहे, आम्‍ही काय करतो, तुम्‍ही केवळ टीआरपीसाठी उभे राहता, काहीतरी फालतू प्रश्‍न विचारता, असे म्‍हणत त्‍यांनी पत्रकार तांबे यांच्‍यासोबत दमदाटी केली. दरम्‍यान पत्रकारांमधून या घटनेचा निषेध केला जात आहे.
मेहता म्हणाले- होय मी चिडलो, पत्रकाराची माफी मागतो
माझ्या वागण्या-बोलण्यामुळे जर संबंधित पत्रकाराला वाईट वाटत असेल, त्याचे मन दुखावल गेले असेल तर मी त्याची माफी मागतो. मी काही एवढा मोठा नाही. मी सर्वसाधारण कार्यकर्ता आह. पण ती संपूर्ण क्लिप दाखवावी. मी मान्य करतो की, त्यावेळी माझा संयम सुटला आणि म्हणून मी चिडलो, असे म्हणत प्रकाश मेहता यांनी माफी मागितली आहे.
मेहतांनी राजीनामा द्यावा, सरकारने माफी मागावी
पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी पत्रकाराशी आक्षेपार्ह वर्तन केले. या प्रकरणी सरकारने निवेदन द्यावे. मेहता यांनी माफी मागावी. फडणवीस सरकारने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली आहे. कॉंग्रेसनेही मेहता यांच्यावर कारवाई करण्याचा मुद्दा लावून धरला आहे. मेहता यांना सत्तेची नशा चढली आहे. त्यांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू दिले जाणार नाही, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, काय म्‍हणाले पालकमंत्री मेहता, कसा झाला वाद..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...