आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबनानंतर परिचारकांचे प्रश्नही पत्रिकेतून वगळले, रस्त्याचा प्रश्न पडला अडगळीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जवान आणि त्यांच्या पत्नींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. सोबतच, त्यांच्याकडून सभागृहात विचारले जाणारे प्रश्नही विषयपत्रिकेतून वगळण्यात आले आहेत. 
 
उत्तर सोलापूर तालुक्यातील ‘कळमण ते दारफळ’ या रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भातला प्रश्न विचारला गुरुवारी परिचारकांकडून जाणार होता. मात्र, त्यांच्या निलंबनामुळे तो वगळण्यात आला.  परिचारक यांनी प्रश्न विचारलेली कळमण, दारफळ गावे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्या मतदारसंघातील आहेत. पण, भ्रष्टाचारप्रकरणी कदम गजाआड आहेत. शुक्रवारच्या प्रश्नोत्तरामध्ये परिचारक यांचा ३४ क्रमांकावर प्रश्न होता. त्यामध्ये त्यांनी दारफळ ते कळमण या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मुद्दे उपस्थित केले होते. २०१५-१६ मध्ये या रस्त्याचे काम केले असतानाही सध्या हा रस्ता धोकादायक बनला आहे, त्यासंदर्भात चौकशीची मागणी त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती. मात्र परिचारकांच्या निलंबनामुळे हा प्रश्नच रद्द करण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...