आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिल्डरने नियमभंग केल्यास भूखंड मालक, सोसायटी जबाबदार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- इमारत विकासकाकडून “रेरा’च्या (रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅक्ट) एखाद्या नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा भूखंड मालकास जबाबदार धरण्याबाबत नव्या गृहनिर्माण नियामक कायद्यातील तरतूद रद्द करत असल्याची माहिती महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी म्हणजेच “महारेरा’ने मुंबई उच्च न्यायालयात दिली. यामुळे अनेक गृहनिर्माण संस्था आणि भूखंड मालकांना दिलासा मिळणार आहे.


यापूर्वी रेरा कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास संबंधित भूखंड मालक किंवा संबंधित गृहनिर्माण संस्थेला जबाबदार धरून कायदेशीर कारवाईची तरतूद मे २०१७ मध्ये ‘महारेरा’ने गृहनिर्माण नियामक कायद्यात केली होती. या तरतुदीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीस आली तेव्हा ही तरतूद रद्द करत असल्याचे प्रतिज्ञापत्र ‘महारेरा’च्या सचिवांद्वारे सादर करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...