आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPECIAL : कातगडे यांच्या आत्मचरित्रातील प्रकरणाचे स्वतंत्र पुस्तक येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
मुंबई - बिहारमधील चंपारण्य येथे जुलमी ब्रिटिश नीळ कारखानदारांच्या अन्यायाविरोधात महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचे यंदा शताब्दीवर्ष सुरू अाहे. सत्याग्रहात सहभागी झालेले गांधीजींचे अनुयायी पुंडलिक कातगडे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात चंपारण्य सत्याग्रहातील स्वत:च्या अनुभवांवर साठ पानांचे एक प्रकरणच आहे. “चंपारण्यातील कार्याचा अनुभव’ या शीर्षकाचे हे प्रकरणच आता स्वतंत्र पुस्तकाच्या रूपात १ जुलै रोजी मुंबईत प्रकाशित होणार आहे. हा मराठीतील पहिलाच प्रयोग असेल. 

गांधीवादी अभ्यासक जयंत दिवाण म्हणाले, टिळकांचे कर्नाटकातील अनुयायी गंगाधरराव देशपांडे यांचे शिष्य म्हणजे पुंडलिक कातगडे. १९१६ मध्ये बेळगाव येथे झालेल्या मुंबई प्रांतिक परिषदेला टिळक व महात्मा गांधी हे दोघेही उपस्थित होते. त्यावेळी कातगडे यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याच वेळी गंगाधर देशपांडे यांच्या सांगण्यावरून पुंडलिक कातगडे चंपारण्यात सेवेसाठी गेले. चंपारण्यात गांधीजींनी तीन आश्रम सुरू केले होते. त्यापैकी एक आश्रम भितीहरवा या गावात होता. या आश्रमात ११ महिने राहून कातगडे यांनी महत्त्वाचे कार्य केले. त्या परिसरातील एमेन या जुलमी नीळ कारखानदाराच्या विरोधात पुंडलिक कातगडे यांनी अभूतपूर्व लढा उभारून स्थानिक गावकऱ्यांना संघटित केले. चंपारण्यातील संघर्षगाथेच्या आपल्या आठवणी पुंडलिक कातगडे यांनी १९५० साली `पुंडलिक’ या आत्मचरित्रातील एका
स्वतंत्र प्रकरणात लिहिल्या. हे प्रकरणच साठ पानांचे आहे.
 
पुंडलिक कातगडे यांची संघर्षगाथा :   गांधीजींनी खेड्याकडे चला आंदोलन सुरू केल्यानंतर गंगाधररावांनी हुदली नावाच्या खेड्यात जाणे येणे सुरू केले. त्यांच्याबरोबर कातगडेदेखील हुदलीस राहू लागले. १९२९ साली जमनालाल बजाज यांच्याकडे कातगडे यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण समितीचे चिटणीस म्हणून काम केले. कातगडे अविवाहित होते. १९३२ च्या मिठाच्या सत्याग्रहात कातगडेंना कारावास भोगावा लागला होता. १९३४-३५ साली बिहारच्या भूकंपग्रस्त भागात कार्य करण्यासाठी महात्मा गांधींनी बोलाविल्यामुळे कातगडे तिथे गेले होते.
बातम्या आणखी आहेत...