आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे माँकडून वाहनाची करचोरी, तपासात रॅकेटचा भंडाफोड, टोळी ठाण्यात अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- वादग्रस्त राधे माँने नुकतीच एक आलिशान कार विकत घेतली. मात्र, जकात करापासून वाचण्यासाठी त्यांनी एजंटची मदत घेतली आणि यातूनच जकात कर चुकवून महागड्या गाड्यांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा ठाण्यात भंडाफोड झाला. ही टोळी भिवंडीतील एका गावातील बनावट पत्त्यांवर वाहनांची नोंदणी करून जकात करत वाचवण्याचे काम करीत होती. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत सुमारे १० कोटी रुपयांच्या वाहनांच्या माध्यमातून ४५ लाख रुपयांची जकात करचोरी केल्याचे उघडकीस अाले आहे. टोळीतील ३० पेक्षा जास्त सदस्यांवर ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शोरूमचे सेल्समन, आरटीओ एजंट आणि महागड्या कारच्या मालकांचाही अाराेपींत समावेश आहे. वादग्रस्त धर्मगुरू राधे माँने एका एजंटच्या माध्यमातून जग्वारची आलिशान कार विकत घेतली. या एजंटने जकात तसेच अन्य कर चुकवण्यासाठी भिवंडीतील एक बनावट पत्त्याची नोंदणी केली. मात्र, त्यांचा भंडाफोड झाला आणि सोबतच एका मोठ्या टोळीचाही पर्दाफाश झाला. याप्रकरणी सपोर्ट नामक एका सामजिक संघटनेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे ४ लाख ९८ हजार २७८ रुपयांच्या करचुकवेगिरीप्रकरणी कलम ४२० आणि ३४ नुसार सजीव गुप्तासह अन्य एका व्यक्तीवर गुन्हा नोंदवला. परंतु दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला. जिल्हा न्यायालयाने तो फेटाळताच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यास आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला. परंतु या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश दिले.  

असे आले प्रकरण उघडकीस  
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे पोलिसांनी २९ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानुसार सर्व महागड्या कारची नोंदणी यादी मिळवली. मात्र, या कारचे ४.५ टक्के जकात कर भरलेच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या संपूर्ण प्रकरणात कार विकत घेणाऱ्यांनी शोरूमचे सेल्समन आणि आरटीओ एजंटशी साटेलोटे करत हा कर चुकवला. यात रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडीझसारख्या महागड्या कारचा समावेश आहे.
 
बातम्या आणखी आहेत...