आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त राधे मॉंवर पुन्हा आरोप, सेक्ससाठी भक्तांवर टाकला दबाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लैंगिक अत्याचार व फसवणुकीच्‍या आरोपाखाली वादात सापडलेल्‍या राधे माँला पोलिस वाचवण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत, असा आरोप वकील फाल्गुनी ब्रम्होभट्ट यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात केला आहे. एक प्रतिज्ञापत्र सादर करून त्‍यांनी या आरोपांबाबत दावा केला आहे. ब्रम्‍होभट्ट म्‍हणाले की, पोलिस निष्‍पक्षपणे या प्रकरणाचा तपास करीत नाहीत. स्‍वयंघोषित गुरू राधे माँ हिच्‍यावर लोकांची दिशाभूल करून लैंगिक शोषणासाठी परावृत्‍त करत असल्‍याचा आरोप आहे.
राधे माँ वरील आरोप
> प्रकरणात हस्‍तक्षेप करून अर्ज करणा-या रमेश जोशी यांनी म्‍हटले आहे की, पोलिसांनी राधे माँ विरोधात महाराष्ट्र सरकारच्‍या जादू टोना विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करायला हवी. पण पोलिसांनी अशी भूमिका घेतली नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.
> अश्लीलतेचा प्रसार व हुंड्यासाठी छळ प्रकरणी राधे माँवर आरोप आहेत.
> राधे माँबाबत असाही दावा करण्‍यात आला की, ती युवक- युवतींची दिशाभूल करून आशीर्वाद देण्‍याच्‍या नावाखाली त्‍यांना पर्सनल रूममध्‍ये घेऊन जात असे व सेक्ससाठी त्‍यांना मजबूर करत असे.
>सुनावणी दरम्‍यान भट्ट म्‍हणाले, कित्‍येक दिग्‍गज राधे माँच्‍या दरबारात जातात. ज्‍या ट्रस्टच्‍या नावावर दान घेतले जाते, त्‍या ट्रस्‍टची वास्‍तवात नोंदणीच नाही.
> धर्माच्‍या नावाखाली हे सेक्‍स रॅकेट चालत असल्‍याचा आरोपही करण्‍यात आला. आरोपांची सखोल चौकशी करण्‍यात यावी अशी मागणीही त्‍यांनी केली आहे.
कोण आहे राधे माँ ?
राधे माँचा जन्‍म पंजाबमधील गुरदासपूर जिल्‍ह्यातील एका शिख परिवारात झाला. तिचे लग्‍न पंजाबमध्‍ये राहणाने व्यापारी सरदार मोहन सिंह यांच्‍याशी झाले आहे. लग्‍नानंतर एका महंतासोबत तिची भेट झाली. त्‍यांनंतर तिने आध्‍यात्‍मिक जीवनाला सुरूवात केली. पुढे ती मुंबईला आणि नि राधे माँ नावाने लोकप्रिय झाली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, राधे मॉंचे भक्‍तांसोबतचे काही खास फोटो..