आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स रॅकेट : राधे माँबाबत शपथपत्र द्या; कोर्टाचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधेमाँविरोधात दाखल असलेल्या सेक्स रॅकेटच्या तक्रारीबाबत शपथपत्र दाखल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने शहर पोलिसांना सोमवारी दिले. न्यायमूर्ती एस. व्ही. एम. कानडे आणि शालिनी फणसाळकर- जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याप्रकरणी वकील फाल्गुनी ब्रह्मभट यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर करून राधेमाँविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे सांगितले. मात्र, याला बह्मभट यांनी आक्षेप घेत "आपण याबाबत पोलिसांना अधिकचे पुरावे दिले आहेत. मात्र, पोलिस काहीही कारवाई करत नाहीत', असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना याप्रकरणी सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.