आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात हरभरा डाळ साठेबाजांवर धाडसत्र, ३८९ छापे, ५२९ व्यापारी अटकेत,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवाळीच्या तोंडावर राज्यात डाळींच्या साठेबाजीस आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण िवभागाने मोठी धडक मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी राज्यात हरभरा डाळ साठेबाजी करणाऱ्यांवर ३८९ धाडी टाकण्यात आल्या. त्यामध्ये ५२९ साठेबाज व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

देशात दोन वर्षांपासून विविध प्रकारच्या डाळींचे भाव प्रचंड कडाडले अाहेत. साठा मर्यादा उठवल्याने हा फटका बसल्याचा आरोप िवरोधक करत आहेत. डाळीचे भाव कडाडल्याचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून भाव खाली आणण्यासाठी फडणवीस सरकार हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. िदवाळीच्या तोंडावर साठेबाजांमुळे राज्यात पुन्हा डाळींचे भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर आवर घालण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत अाहे. त्याचाच भाग म्हणून चणाडाळ साठेबाजांवर बुधवारी राज्यभर धाडसत्र राबवण्यात आले होते.
७०० मे. टन डाळीची मागणी
राज्यात दिवाळीच्या तोंडावर चणाडाळीचे भाव स्थिर राहावेत यासाठी केंद्राकडे ७०० मेट्रिक टन डाळीची मागणी करण्यात आल्याची माहिती नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी िदली. केंद्र सरकारकडून प्राप्त झालेली चणाडाळ ७० रुपये किलो दराने िवकली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील चणाडाळीचे दर स्थिर राहतील अशी राज्य सरकारला आशा आहे.
७२ हजार किलो डाळ जप्त
राज्याच्या विविध भागात तब्बल ३८९ धाडी घालण्यात आल्या. त्यामध्ये ७२ हजार ६०० किलो चणाडाळ जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या डाळीची िकंमत २ कोटी ६१ लाख ६३ हजार रुपये आहे. या धाडसत्रात ५२९ साठेबाजांना अटक करण्यात आली असून २३० जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
ऊस गाळप ५ नोव्हेंबरपासून
मुंबई | ऊस गाळप हंगामाची चाळीस वर्षांची परंपरा मोडून यंदा एक महिना विलंबाने राज्य सरकारने साखर कारखाने चालू करण्याची तारीख िनश्चित केली होती. मात्र खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेने बुधवारी तो िनर्णय सरकारला मागे घ्यायला लावला. आता गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार अाहे. या दबावाखातर आपलाच िनर्णय दोन आठवड्यांच्या आत फिरवण्याची वेळ सरकारवर आली.राज्यातील उसाची कमतरता व उपलब्धता लक्षात घेऊन यंदाचा ऊस गाळप हंगाम १ डिसेंबरपासून घेण्यात येणार होता.
१५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी
नागपूर | कापूस पणन महामंडळाची कापूस खरेदी राज्यात १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. याही वेळी सीसीआयचा एजंट म्हणून पणन महासंघ कापूस खरेदी करणार आहे. राज्यात १२५ खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असून त्यापैकी ७० केंद्रे पणन महासंघाची राहणार आहेत. शासनाच्या मार्जिन मनीवर बँकेचे कर्ज काढून थेट खात्यावर पैसे जमा करण्यात येइल, असे पणन महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...