आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाखवायला काही नसल्यानं भांडणाचं नाटक, राज ठाकरे यांची शिवसेना, भाजपवर टीका;(महाकौल)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई -‘मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट ३७ हजार कोटीचं, त्यातले पगारावर जातात २२ हजार कोटी. म्हणजे विकासाच्या वाट्यास येतात १५ हजार कोटी. पाच वर्षांचा हिशेब केला तर युतीकडे विकासासाठी ७५ हजार कोटी हाेते, पण कुठे गेले ते कळत नाही. मुंबईत तर काम काही दिसत नाही. काही केलंच नाही, नुसतं ओरबाडून खाल्लं. आता दाखवायला काही नाही, म्हणून शिवसेना अन‌् भाजप दोघेही भांडभांड भांडून मतदारांचे लक्ष विचलित करत आहेत,’ अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत केली. 
  
या वेळी ‘मनसे’ने जाहीरनामा प्रसिद्ध केला नसल्याबद्दल विचारले असता राज ठाकरे म्हणाले, ‘गुळगुळीत कागदावर आश्वासने देऊन उपयोग काय? दिलेली वचने पाळतो कोण? मग असल्या फालतू प्रथा का पाळायच्या? म्हणून ‘मनसे’ने जाहीरनामा काढला नाही. आम्ही नाशिकात जे बोललो नव्हते, ते केले,’ असे सांगतानाच पाच वर्षांतल्या आपल्या कामांचे प्रेझेंटेशन करणारा ‘मनसे’ देशातला पहिला पक्ष असल्याचा दावाही त्यांनी केला.
 
 ‘मुंबईत रस्ते ठेकेदार बांधतात, तसेच नाशिकमध्येही बांधतात. मग मुंबईच्याच रस्त्यावर खड्डे का पडतात? नाशिकमध्ये साडेअकराशे कोटींत उत्तम रस्ते होतात. मुंबईत ७५ हजार कोटींतही होत नाहीत?,’ असा प्रश्न राज यांनी केला.  त्यावर उद्धव ठाकरे यांच्या ‘मुंबईतले अनेक रस्ते राज्य सरकारचे आहेत’ या विधानाची त्यांना आठवण करून दिली. त्यावर राज उसळून म्हणाले, ‘सरळ सरळ खोटं आहे, अपयश झाकायचा हा प्रयत्न आहे. रस्ते राज्याच्या मालकीचे मग उद्घाटनाला उद्धव का जातात,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.  
 
‘शहर नियोजनात मी ब्रिटिशांना आदर्श मानतो. मुंबईत एकहाती सत्ता मिळाली तर नाशिकप्रमाणे विकास करता येईल.  सीएसआर फंडातून शहराचा विकास करता येतो, हे मनसेने नाशिकमध्ये दाखवले; पण ‘सीएसआर’च्या नादी इतर कोणी लागत नाही, त्यात टक्केवारी मिळत नाही,’ असा टाेलाही राज ठाकरेंनी  शिवसेनेला उद्देशून लगावला. 
  
‘टक्केवारी’प्रेमी लाेक मनसे साेडून गेले  
‘नाशिकमध्ये जर विकास केला, तर मग ‘मनसे’ला गळती का लागली?’ या प्रश्नावर राज म्हणाले, ‘टक्केवारीच्या गोष्टी मी करू दिल्या नाहीत. ज्यांना विकासाशी घेणंदेणं नव्हतं तेच मनसे सोडून गेले. पण ही मंडळी जाताना एकटी गेली. लोक तेव्हा ओळखता आले नाहीत. लाट असते, ओसरल्यावर करवंट्या आपोआप दिसतातच. नाशिकचे अनंत कान्हेरे मैदान माझ्या सभांना आजही फुल्ल होते. ती भाड्याची गर्दी नसते. भाड्याने लोक येतात, उत्साह नाही आणता येत, असा टोलाही त्यांनी मारला.
 
राज म्हणाले... 
-‘नाशिक महापालिका निवडणुकीत ८८ गुंड उभे आहेत. त्यातले सर्वाधिक उमेदवार भाजपचे अाहे.   
- भाजपवाले महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याची चाल खेळत आहेत, त्याची प्रक्रिया गेली काही वर्षे पद्धतशीरपणे राबवण्यात येत आहे.   
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परफाॅरर्मन्स असता, तर त्यांना थापा माराव्या लागल्या नसत्या. मुख्यमंत्र्यांना काही दाखवायला नाही, बोलायला काही नाही, त्यामुळे ते ऊठसूठ विरोधकांवर टीका करत अाहेत.  
- उद्योगपती रतन टाटा यांच्या सांगण्यावरून मी गुजरातमध्ये गेलो होतो. त्या वेळी गुजरातचे तसे चित्र उभे केले होते. म्हणून मी त्या वेळी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. आज मी मोदी यांच्यावर टीका करतो. येथे प्रश्न भूमिकांचा आहे, व्यक्तीचा नाही.  
बातम्या आणखी आहेत...