आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे संपूर्ण ताकदीनिशी निवडणुका लढणार, पदाधिकाऱ्यांसमोर राज ठाकरेंचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसहित मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढून जास्तीत जास्त ठिकाणी विजय संपादन करण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटाला मनसे करत असलेल्या विरोधाची प्रशंसा करून हीच भूमिका कायम ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज ठाकरे यांनी शुक्रवारी मनसेचे नेते, उपाध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्याबरोबर कृष्णकुंज येथे अचानक बैठक घेतली. बैठकीबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले, राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी कशा प्रकारची रणनीती असावी याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. निवडणुकीत जास्तीत जास्त यश कसे मिळवता येईल यावर सविस्तर चर्चा झाली. राज ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना स्थानिक समस्यांवर भर देत प्रचार करावा, असे सांगितल्याचेही सूत्रांनी सांगितले. बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबतही सखोल चर्चा झाली.

‘ऐ दिल है मुश्किल’ ला विरोध कायम
करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ला अाणखी तीव्र विराेध करू. या चित्रपटासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत धाव घ्यावी लागली यातच आमचे यश आहे, असे मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खाेपकर म्हणाले.
निवडणुकांसोबतच ठाकरे यांनी बैठकीत मनसे चित्रपट शाखेने करण जोहरच्या पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटाला केलेल्या विरोधाबाबत प्रशंसा केली. विरोध कायम ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. याबाबत सोशल मीडियावर येणाऱ्या पोस्टची माहिती घेत राहावी, अशा सूचनाही दिल्या.
बातम्या आणखी आहेत...