आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळत नाही तिथे नाना पाटेकरने चोंबडेपणा करू नये, राज ठाकरेंचा जोरदार हल्‍लाबोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल नाना पाटेकरने बोलावे, ज्या विषयांची माहिती नाही, त्यात उगाच चोंबडेपणा कररू नये, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईतील एका कार्यक्रमात नानाने फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देणे चुकीचे असल्याचे विधान केले होते. नानाच्या त्या वक्तव्याचा राज यांनी समाचार घेतला. वांद्रेत शनिवारी आयोजित केलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 
 
महात्मा नाना पाटेकरांना फेरीवाल्यांचा फार पुळका आला आहे. नानाला वाटते तो चंद्रावरून पडलाय, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती, तेव्हा नाना बोलला नाही. तेव्हा मनसेने लढा दिला, असे स्पष्ट करत राज यांनी नानाची मिमिक्री केली. नाना मोठा कलाकार आहे, त्याचा अभिमान आहे. त्याचे चित्रपट आम्ही जरूर बघू. पण, आम्ही काय करायचे हे त्याने शिकवू नये. फेरीवाल्याच्या प्रश्नात सरकारने काही करायला पाहिजे, असे नाना आज म्हणाला. मग, पाण्याच्या प्रश्नावर तू का नाम फाउंडेशन काढली. सरकारलाच सांगायचे पाण्याचा प्रश्न सोडवायला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.    

फेरीवाल्याविरोधातील आंदोलनात ज्या मनसे सैनिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, ज्यांच्यावर केसेस पडल्या, त्या सर्वांचे राज यांनी अभिनंदन केले. सरकार आल्यावर केसेस काढून टाकू, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.     दक्षिणेतले कलावंत स्थानिक प्रश्नासाठी रस्त्यावर येतात, तसे आमचे का  येत नाहीत असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. फेरीवाल्यांना मराठी अधिकारीच रान देतात असा आरोप त्यांनी केला. मुंबईतले फेरीवाले दरवर्षी दोन हजार कोटींचा हप्ता देतात, असे सांगत इथे कुंपणच शेत खात असल्याचे राज म्हणाले.   रेल्वे स्टेशनच्या दीडशे मीटरच्या आत फेरीवाल्यांना धंदा करता येणार नाही, असा िनर्णय िदल्याबद्दल राज यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले. मुंबईतले वाॅर्ड अधिकारी, रेल्वे मास्तर, पोलिस यांना मनसे कार्यकर्ते उच्च न्यायालयाच्या निकालासोबत माझे पत्र देतील. त्यानंतरही फेरीवाले हटले नाहीत तर अधिकाऱ्यांवर आपण अवमान याचिका दाखल करणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.   
झोपड्यांच्या जागी मोहल्ले झाले आहे. बांगलादेशी मुस्लिम आहेत. उद्या पाकिस्तानशी युद्ध झाल्यास आपल्याला देशातच लढावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. गाफील न राहता, महाराष्ट्राने सतर्क राहावे. जागता पहारा देण्याचे काम मनसे करेल, असे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...