आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी ज्ञानभाषा झाल्यास लोक इंग्रजीपासून दूर होतील, प्रख्यात साहित्यिक राजन खान यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - ‘जोवर मराठी ही भाषा लोकांचे पोटाचे प्रश्न सोडवू शकणार नाही तोवर तिला भवितव्य नाही. ती ज्ञानभाषा होईल तरच लोक इंग्रजीपासून दूर होतील,’ असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक राजन खान यांनी साेमवारी केले.   

महाराष्ट्र दिनी बोधी नाट्य परिषदेच्या वतीने दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात आयोजिलेल्या एका कार्यक्रमात “अभिजात मराठी भाषा : दशा व दिशा’ या विषयावरील व्याख्यानात राजन खान बोलत होते.   
 
मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे अशा आशयाचा सूर महाराष्ट्रात हल्ली वारंवार ऐकायला मिळतो. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून प्रयत्नशील आहे. मात्र, त्या प्रयत्नांना अद्याप यश येताना दिसत नाही. ही स्थिती लक्षात घेऊन बोधी नाट्य परिषदेने गेल्या वर्षीपासून   स्वत:च पुढाकार घेऊन महाराष्ट्रदिनी अभिजात मराठी दिन कल्पून तसे कार्यक्रम आयोजिण्यास सुरुवात केली आहे. या समारंभाप्रसंगी काव्यसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. कवयित्री व चित्रकार मीनाक्षी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले. याप्रसंगी भगवान निळे, अविनाश गायकवाड, कविता मोरवणकर, स्वप्निल गांगुर्डे, शांतीलाल ननावरे, प्रवीण दामले, कुंदन कांबळे, गोविंद नाईक, विक्रांत शिंदे, शर्वरी मुनिश्वर, शिल्पा देशपांडे आणि मीनाक्षी पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्यिक प्रेमानंद गज्वी यांनी मनोगत व्यक्त केले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...