आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राकेश मेहरांच्या पुढाकाराने शाळांमध्ये शौचालये, वाचा सलमान, दीपिकाच्‍या कार्याविषयी..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अहमदाबाद, बडोदापाठोपाठ ठाण्यातील शाळांमध्ये शौचालये आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याचे काम चित्रपट निर्माता व दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा करत आहेत. संपूर्ण राज्यभर हे काम करण्याचाही त्यांचा मनोदय आहे. राकेश मेहरा युवा अनस्टॉपेबल या अहमदाबादस्थित एनजीओसोबत हे काम करण्यात येत आहे.
देशात प्रत्येकाला शिक्षण देणे हा मूलभूत अधिकार आहे. मात्र, गरीब श्रीमंतांमध्ये जो भेद आहे अगदी तसाच शिक्षणातही आहे. श्रीमंतांच्या मुलांच्या शिक्षणावर महिन्याला जितका खर्च होतो तो अनेक विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्षाचा खर्च आहे. ही दरी अधिकाधिक रुंदावत चालली असल्यानेच गरीब विद्यार्थी शिक्षण सोडून देतात. सरकारी शाळांमध्येही शौचालयासारख्या प्राथमिक सुविधाही दिल्या जात नाहीत मात्र त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात ते कोठे होतात असा प्रश्न मेहरा यांनी उपस्थित केला.
सफाईसाठी कर्मचारी, भिंतीचीही रंगरंगोटी
राकेश मेहरा यांनी अाजवर सामाजिक काम केलेल्या शाळांत चांगली शौचालये तर बांधली आहेतच, परंतु त्यांची नेहमी स्वच्छता ठेवण्यासाठी कर्मचारीही ठेवले. भिंती स्वच्छ करून रंगवल्या. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. आता महाराष्ट्रातील ठाण्यात चार ते पाच शाळांत काम सुरू केले आहे. शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. पुढे राज्यातील अन्य भागातही हे काम करण्यात येणार असल्याचे मेहरा यांनी सांगितले.
शूटिंगसाठी गेल्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय
तीन वर्षांपूर्वी चित्रीकरणासाठी मेहरा अहमदाबादच्या एका गावात गेले होते. काही कामासाठी गावातील शाळेत ते गेले. तेथील अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले. मुला-मुलींसाठी एकच शौचालय होते. पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. भिंती पडलेल्या होत्या. यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून मेहरा यांनी हा निर्णय घेतला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सलमान, अक्षय, आमिर, दीपीका यांचे समाजकार्य..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...