आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश आंबेडकर मला ओळखत नसले तरी मी त्‍यांना ओळखतो- आठवलेंचे उत्‍तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मला ओळखत नसले तरी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून मी त्यांना ओळखतो आणि त्यांचा आदर करतो,’ असे प्रत्युत्तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. आंबेडकर भवनाच्या वादाच्या पार्श्वभ्ूमीवर प्रकाश आंबेडकरांनी ‘मी आठवलेंना ओळखत नाही,’ असे म्हटले हाेते.

मंत्रालय वार्ताहर संघात सोमवारी संवाद साधताना आठवलेंनी विविध प्रश्र्नांना दिलखुलास उत्तरे दिली. ‘आंबेडकर भवन विषयाबाबत मी बैठक बोलावली तरी त्याला आंबेडकर येणार नाही. पण, त्यांच्यावर अन्याय होऊ नये हीच माझी भावना आहे. आंबेडकर भवनात सतरा मजली इमारत होणार असून तेथे प्रकाश आंबेडकर व कुटुंबियांना हवी असल्यास सात-आठ हजार फुटांची जागा प्रेससाठी तसेच अाॅफिसकरिता जागा द्यावी. अथवा सध्याच्या प्रेसच्या जागेचा अडतीसशे फुटांचा भूखंड त्यांच्यासाठी सोडून बांधकाम केले जावे. आंबेडकर भवन तिथे व्हावे हीच आमची सर्वांची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलेन व त्यांनी यात पुढाकार घेऊ आंबेडकरांना बोलावून बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी विनंती करेन,’ असे आठवले म्हणाले.
इंदू मिलच्या जागेतील स्मरकाचे काम महिन्याभरात सरू होईल, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला. मी या खात्याच्या आधीच्या मंत्र्यांशी मी बोललो होतो. राज्य सरकारने १२५० कोटी रुपये एनटीसीला दिल्यानंतर जागा राज्य सरकारला देण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळांपुढे येईल व काम सुरू होईल. ही प्रक्रिया गतिमान करावी यासाठी मी मंगळवारी वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणींना भेटणार आहे. अडीच वर्षात इंदू मिलच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हायला हवे. शशी प्रभूंनी जो त्यासाठी आराखडा केला आहे त्यात समाजाच्या मंडळींच्या सूचना घेऊन सुधारणाही करता येतील. ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्यायमंत्री बडोलेंकडे सोपवलेली आहे, अशी माहिती आठवलेंनी दिली.
बातम्या आणखी आहेत...