आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी’वर नाराज रमेश कदमांनी भाजपला मतदान केल्याची चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काेट्यवधींच्या भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगाची हवा खात असलेले राष्ट्रवादीतून निलंबित झालेले अामदार रमेश कदम यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या मूळच्या पक्षावर राग काढल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व अामदारांंनी ‘यूपीए’च्या उमेदवार मीरा कुमार यांना मतदान करण्याचा दावा केला जात अाहे. मात्र या पक्षावर नाराज असलेल्या कदम यांनी भाजपप्रणीत एनडीए उमेदवार रामनाथ काेविंद यांच्या पारड्यात मताचे दान टाकल्याची जोरदार चर्चा साेमवारी राजकीय वर्तुळात हाेती. दरम्यान, राज्यातील एकूण २८८ पैकी २८७ अामदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले. अामदार क्षितिज ठाकूर हे परदेशात असल्यामुळे मतदान करू शकले नाहीत.  

अामदार मेधा कुलकर्णींनी केले पहिले मतदान : राष्ट्रपतिपदासाठी साेमवारी राज्यातील २८७ अामदार व एका राज्यसभा सदस्याने मतदान केले. विधान भवनात सकाळी ठीक दहा वाजता सुरू झालेल्या या मतदानात पुण्याच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सर्वप्रथम मतदान केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११.२५ वाजता मतदान केले. पहिल्या टप्प्यात एका तासात ८५  मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री मदन येरावार, विजय देशमुख यांचा समावेश होता. दुपारी बारापर्यंत १९१ मतदारांनी मतदान केले. राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनीही मुंबईतच मतदान केले. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली.

क्राॅस व्होटिंगचा विरोधकांकडून इन्कार   
अपक्ष आमदार रवी राणा यांनी सर्व सहा अपक्ष अामदार रामनाथ काेविंद यांना मतदान करतील, असे आधीच जाहीर केले होते. याचबरोबर विरोधकांच्या मतातही फूट पडेल, असा दावा त्यांनी केला होता. यामुळे मतदाना वेळी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. काँग्रेस व राष्ट्रवादीचे मिळून किमान ७ ते ८ आमदार क्रॉस व्हाेटिंग करतील, असे बोलले जात होते. मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते यांनी असे काही झाल्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...