आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलवर बलात्कार; आणखी दोघांना अटक, तीन पोलिसांसह आठ जणांना पोलिस कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माॅडेल बलात्कारप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी आणखी दोघांना अटक केली आहे. त्यामुळे अाराेपींची संख्या आठ झाली आहे. त्यात तीन पोलिसांचा समावेश आहे. या आरोपींना २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात अाली अाहे.

सुनील खपाटे, सुरेश सूर्यवंशी दोघेही (सहपोलिस निरीक्षक), योगेश कोंडे (हवालदार), जावेद शेख, इब्राहिम खान, तन्वीर हश्मी, संजय रामारोंगे व आशा मालिवय अशी आरोपींची नावे आहेत.

पीडित २९ वर्षीय मॉडेल ही एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेली होती. या वेळी तीन पोलिसांनी ितला "तू देहविक्रय' करत असल्याचे सांगत जवळच्या पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर यातील एकाने तिच्यावर अत्याचार करून ४ लाख ३५ हजार रुपये हिसकावले. त्यानंतर २१ एप्रिल रोजी पीडितेने मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना एसएमएस करून झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर मारिया यांनी मॉडेलला पोलिस ठाण्यात बोलावून घेत याप्रकरणी तक्रार नोंदवून घेत पोलिसांसह इतरांना गुुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानुसार तीन पोलिसांसह आठ जणांना अटक करण्यात आली.

पीडितेला बॉलीवूडमध्ये करिअरची इच्छा
पीडित तरुणीने ऑस्ट्रेिलयातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून ती दोन वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी भारतात आली आहे. आरोपीपैकी एकाने आपल्याला चित्रपटात संधी देण्याचे आमिष दाखवल्याचे तिने आपल्या जबाबात म्हटले आहे.