आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट प्रदर्शित झाल्यास मनसे स्टाइल उत्तर, करण जोहरसह मल्टिप्लेक्स मालकांना पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट बनवणे हे जरी तुमच्या हातात असले तरीही तो प्रदर्शित होऊ न देणे हे आमच्या हातात आहे, असा सज्जड इशारा देत मनसेच्या चित्रपट सेनेने ‘ए दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे पत्रच दिग्दर्शक करण जोहरसह मुंबई आणि राज्यभरातील मल्टिप्लेक्स सिनेमागृहांच्या मालकांना मनसेकडून देण्यात आले आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे करण जोहरच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित केल्यास त्याला मनसे स्टाइल उत्तर देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

आपल्या चित्रपटावरील संकट दूर व्हावे यासाठी राज ठाकरेंकडे सलमान खानद्वारे मध्यस्थीसाठी प्रयत्न करणाऱ्या करण जोहरचा अखेर पुरता भ्रमनिरास होण्याची चिन्हे आहेत. पुढच्या आठवड्यात दिवाळीच्या मुहूर्तावर पाकिस्तानी कलाकार फवाद खान याचा समावेश असलेला त्याचा ‘ऐ दिल ए मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र, सध्या तणावग्रस्त भारत -पाक संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करणारे एक पत्र मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी करण जोहरला पाठवले आहे. याबाबत बोलताना अमेय खोपकर म्हणाल की, हे पत्र करण जोहरला पाठवले आहेच, शिवाय या पत्राच्या प्रती राज्यभरातील मल्टिप्लेक्स मालकांनाही पाठवण्यात आल्या असून त्यानंतरही कुणी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मनसे स्टाइल उत्तर देऊ, असेही अमेय खोपकर यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी सुरू केल्या भेटीगाठी
काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज यांनी आपण मुंबईतील सर्व शाखांना व्यक्तिश: भेटी देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारपासून त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना सुरुवात केली. सोमवारी त्यांनी भायखळा आणि वरळी या भागातील मनसेच्या काही शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी सकाळी मनसेच्या विभागाध्यक्षांची एक बैठकही त्यांनी कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी घेतली.
बातम्या आणखी आहेत...