आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपदावरून रिपाइं कार्यकर्त्यांत धुसफूस, सीमा यांची वर्णी लावली जात असल्याचा अाराेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात सर्व छाेट्या- छाेट्या घटक पक्षांनाही स्थान देणार असल्याची घाेषणा नुकतीच भाजपचे ज्येष्ठ नेते व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली अाहे. त्यापाठाेपाठ रिपब्लिकन पक्षाच्या अाठवले गटात मात्र मंत्रिपदावरून धुमशान सुरू झाले अाहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षाध्यक्ष रामदास अाठवले अापल्या पत्नी सीमा यांची मंत्रिपदावर वर्णी लावण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी उफाळून अाली अाहे. ‘सीमा अाठवले या नवबाैद्ध नाहीत, त्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊ नये,’ असा सूरही पक्षात उमटू लागला अाहे.

विधानसभा निवडणुकीत अाठवलेंचा रिपाइं हा पक्ष भाजप आघाडीत होता. वाट्याला अालेल्या नऊ जागांपैकी रिपाइंची एकही जागा निवडून आली नाही. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात या पक्षाला एक मंत्रिपद मिळणे निश्चित झाले आहे. त्यावर वर्णी कोणाची, यावरुन पक्षात सध्या चर्चेला उधाण उठले असून मोठे तर्कवितर्क सुरू आहेत.

आठवले सध्या राज्यसभेवर आहेत. रिपाइंतील ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांनी िवधानसभा निवडणुकीत आठवले यांची साथ सोडून शिवसेनेशी घरोबा केला आहे. पँथरच्या काळातील लढाऊ नेते अाणि पक्षात सध्या ज्येष्ठ असलेले अविनाश महातेकर मंत्रिपदाचे मुख्य दावेदार आहेत. त्यात आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांचेही नाव पुढे येते आहे. सीमा आठवले या रिपाइंच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. मात्र त्या नावापुरत्या अध्यक्षा आहेत. त्या पक्षात म्हणाव्या तितक्या सक्रिय नाहीत. त्यात सीमा आठवले या नवबौद्ध नाहीत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊ नये. काहीही झाले तरी मंत्रिपद बौद्ध कार्यकर्त्यालाच िमळायला हवे, असे कार्यकर्ते खासगीत सांगतात.

फूट पडण्याची भीती
जुन्या कार्यकर्त्यांना डावलून सीमा यांना मंत्रीपद दिल्यास पक्षातील कार्यकर्ते नाराज होणार. कदाचित रिपाइंत उभी फूटही पडू शकते. नेमकी हीच गोष्ट भाजपला हवी आहे. कारण तसे झाल्यास िरपाइंचा राज्यातला उरलासुरला जनाधार संपुष्टात येईल. असे होणे भाजपसाठी अधिक सोईचे आहे, असा काही कार्यकर्त्यांचा दावा आहे.
कॅबिनेट मंत्रिपदच
हवे : गौतम साेनवणे

रिपाइंतील हा गोधळ पाहून स्वत: रामदास आठवले मंत्रिपद स्वीकारतील, अशी अटकळ काही कार्यकर्ते सांगत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंला कॅबिनेट मंत्रिपद पाहिजे, राज्यमंत्रिपद आम्ही स्वीकारणार नाही, मंत्रिपदी कोण हा निर्णय पक्षाध्यक्ष घेतील, असे रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. दरम्यान, पक्षात काेणताही वाद नसून अाठवले सांगतील त्याचेच नाव मंत्रिपदी निश्चित हाेईल, असेही साेनवणे यांनी स्पष्ट केले.