आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे, पुणे, नागपूरसह 14 महापालिकांचे महापौरपदे महिलांसाठी राखीव, मुंबई खुले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी आरक्षण सोडत जाहीर केली. - Divya Marathi
मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी आरक्षण सोडत जाहीर केली.
मुंबई - राज्यातील २७  महानगरपालिकांच्या महापौरपदांची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली. या २७ पैकी १४ महापौरपदे विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली. औरंगाबादचे महापौरपद ओबीसी पुरुषांसाठी राखीव झाले.
 
मुंबई, लातूर, धुळे, मालेगाव, अकोला, वसई- विरार, भिवंडी व अहमदनगरमध्ये खुल्या प्रवर्गातील पुरुष, ठाणे, कल्याण-डोबिंवली, उल्हासनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नागपूरचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिला तर पिंपरी- चिंचवड, औरंगाबाद, नवी मुंबईत ओबीसीचे महापौर असतील. नाशिक एसटीसाठी तर अमरावतीचे महापौरपद एससीसाठी राखीव झाले. महिलांसाठी आरक्षित १४ महापौरपदांपैकी २ एससी, ४ ओबीसी व ८ महापौरपदांवर खुल्या प्रवर्गातील तर नांदेड व पनवेल एससी, मीरा भाईंदर, जळगाव, सांगली, चंद्रपूरचे महापौरपद ओबीसी महिलांसाठी राखीव आहे.

आज जाहीर करण्यात आलेल्या महानगरपालिकांचे प्रवर्गनिहाय महापौर पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे.
अनुसूचित जमाती प्रवर्ग - नाशिक महानगरपालिका. (एकूण एक)
अनुसूचित जाती प्रवर्ग - अमरावती महानगरपालिका. (एकूण एक)
अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला) - नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका. (एकूण दोन)
ओबीसी प्रवर्ग - नवी मुंबई महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका.  (एकूण तीन)
ओबीसी प्रवर्ग (महिला) - मिरा-भाईंदर महानगरपालिका, जळगांव महानगरपालिका, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिका. (एकूण चार)
सर्वसाधारण प्रवर्ग - लातूर, धुळे, मालेगांव, बृहन्मुंबई, भिवंडी-निजामपूर, अकोला, अहमदनगर, वसई-विरार महानगरपालिका. (एकूण आठ)  
सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) - ठाणे, कल्याण-डोबिंवली, उल्हासनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नागपूर महानगरपालिका. (एकूण आठ) याप्रमाणे आरक्षण जाहिर झाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...