आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ चौधरी यांच्यामुळे धोनीने दिला राजीनामा ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महेंद्रसिंग धोनीने ‘अचानक’ कर्णधारपद सोडण्याचे रहस्य बीसीसीआयच्या नाकीनऊ आणणाऱ्या बिहारच्या आदित्य वर्माने उलगडले आहे. बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांच्या सांगण्यावरून निवड समितीचे अध्यक्ष एम. के. एस. प्रसाद यांनी धोनीला पुढील ‘प्लॅन’ काय, असे विचारून सूचित केले होते. त्यावरून चिडलेल्या धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारचा राजीनामा दिला, असा आरोप आदित्य वर्मा यांनी केला आहे. नागपूर येथे रणजी सामना सुरू असताना एम. एस. के. प्रसाद यांनी महेंद्रसिंग धोनीची भेट घेऊन त्याच्याशी पुढील योजनांबद्दल विचारविनियम केला होता.  

त्याआधी झारखंडचे अमिताभ चौधरी यांनी धोनीला उपांत्य फेरीचा सामना खेळण्याचा आग्रह केला होता. धोनीने आपण संघासाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावू, असे सांगून त्याप्रमाणे कृतीही केली होती. मात्र, झारखंड संघ पराभूत झाल्यानंतर चौधरी यांनी डाव साधला. प्रसाद याच्या ‘सांकेतिक’ सूचनांमुळे उद्विग्न झालेल्या धोनीने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. 
बातम्या आणखी आहेत...