आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित मोर्चांना आठवलेंचा पाठिंबा, सरकारसमोर पेच, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांत खाेडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा समाजाच्या मोर्चांना प्रत्युत्तर म्हणून दलित समाजाने मोर्चे काढू नयेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्याआडून केलेल्या प्रयत्नांना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्याने साथ दिली असताना भाजपसोबत सत्तेत सामील रामदास आठवले यांनी मात्र वृत्तवाहिन्यांशी बोलताना दलित समाजाच्या प्रतिमोर्चांना पाठिंबा जाहीर केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र हे मोर्चे मराठ्यांविरुद्ध नसून अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणीच्या विरोधात असतील, असे आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारला अडचणीत आणून आपली नाराजी दाखवून देण्याची की दलित नेत्यांमध्ये आपली उंची वाढविण्यासाठी ही खेळी आहे, याबद्दल आता राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. यामुळे राज्य सरकारसमोरही नवी डोकेदुखी उभी राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार हे राज्यात निघत असलेल्या मराठा समाज मोर्चांमुळे अस्वस्थ अाहेत. याला प्रत्युत्तर म्हणून भविष्यात दलित समाजाने प्रतिमोर्चे काढल्यास वातावरण चिघळू शकते, अशी भीती राज्य सरकारला वाटत आहे. त्यामुळे फडणवीस यंानी सर्वच दलित नेत्यांना असे प्रतिमोर्चे काढू नयेत, यासाठी राजी करण्याचे प्रयत्न पडद्याआडून चालवले आहेत. भारिप- बहुजन महासंघाचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलितांनीही प्रतिमोर्चे काढू नये, असे आवाहन केल्यानंतर मराठा समाजाला आव्हान देणारे प्रतिमोर्चे निघणार नाहीत हे जवळपास निश्चित झाले होते. मराठा समाजाचे मोर्चे हे दलितविरोधी असल्याचा प्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. ते काही लोकांना हाताशी धरून संघ परिवार दलितांचे प्रतिमोर्चे काढण्याचा प्रयत्न करीत आहे. जे असे मोर्चे काढतील ते संघ आणि भाजपच्या हातातील बाहुले झालेले असतील, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. मात्र दलित राजकारणात आंबेडकर आणि आठवले यांची स्पर्धा जगजाहीर आहे. आठवलेंनी आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, दलितांचे मोर्चे मराठा समाजाविरोधात नाहीत
बातम्या आणखी आहेत...