आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारटीअाे भूखंड मूल्यांकन चुकीचे झाल्याचा संशय!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अंधेरी येथील आरटीओच्या भूखंडाच्या मूल्यांकनाविषयीच संशय निर्माण झाला अाहे. एकाच भागातील दर वेगवेगळे ठरवण्याचे काम शासकीय मूल्यांकन मापक शिरीष सुखात्मे यांनी केल्याचे समोर आले आहे. सुखात्मे यांनी अवघ्या एका दिवसात सादर केलेल्या या साशंक अहवालामुळे ‘एसीबी’ने शहानिशा न करता महाराष्ट्र सदन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आल्याचा मुद्दा जोर धरत आहे. दरम्यान, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ठपका ठेवण्यात अालेल्या ‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणात त्यामुळे अाता नवे वळण लागण्याची शक्यता अाहे.
सुखात्मे यांनी ८ जून २०१६ ला दिलेल्या अहवालात ‘आरटीओ’च्या भूखंडाचा दर हा अंधेरी रेल्वे स्थानकाजवळच्या इमारतींमधील दुकानांच्या दराएवढा काढला होता. या िवभागात वाणिज्य वापराचे सरासरी दर १ लाख १४ हजार २९१ रु. असल्याची नोंद करून बांधकाम िवभागाने केली हाेती. तसेच या व्यवहारात विकसकाला ७४९ कोटींचा फायदा िमळवून िदला, असा िनष्कर्षही चाैकशीत होता. पण, हे मूल्यांकनच चुकीचे असून भूखंड ज्या भागात येतो, त्याच भागात सनदी अधिकाऱ्यांची पाटलीपुत्र या सोसायटी अाहे. या सोसायटीतील कामधेनू व्यापारी संकुलात चालवण्यात येणाऱ्या रेंजवेअर कंपनीला त्याच कालावधीत म्हणजे सन २००६ मध्ये सदर भूखंड पावणेआठ कोटी रुपये भाडेपट्ट्याने देण्यात आला. या वेळी रेडीरेकनरचा दर ८६ हजार रुपये प्रति चौरस मीटर असा हाेता. िवशेष म्हणजे पाटलीपुत्रप्रमाणेच अारटीओ भूखंडाचा भूमापन क्रमांक ४७/२३३ असा एकसारखा होता. पण, आरटीओच्या भूखंडासाठी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील नगर भूमापन क्रमांक गृहीत धरून सुखात्मे यांनी दर लावला तो १ लाख १४ हजारांचा. सुखात्मे यांच्या अहवालाच्या आधारे ‘एसीबी’ने गुन्हा दाखल केला खरा, पण बांधकाम िवभागाच्या विद्यमान मुख्य अभियंत्यांचा अहवाल मात्र वेगळा असल्याने या प्रकरणात अाता संशय िनर्माण झाला आहे. आरटीओ भूखंडप्रकरणी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, असे मुख्य अभियंत्यांच्या अहवालात म्हटले अाहे. हा अहवाल सुखात्मेच्या अहवालापूर्वीच एसीबीकडे आला होता. बांधकाम मंत्री तसेच सचिवांच्या सही व मान्यतेनेच हा अहवाल िदला गेला. या दोन वेगवेगळ्या अहवालांमुळे भाजप सरकार अडचणीत आले आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पहिला अहवाल रद्द करून सुधारित अहवाल िदल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. या साऱ्या प्रकारामुळेच आता प्रत्यक्षात महाराष्ट्र सदनप्रकरणी आरोपपत्र दाखल होण्यास विलंब होत आहे.

महाराष्ट्र सदनाचा ओढूनताणून संबंध
महाराष्ट्र सदनाचा अंधेरीतील आरटीओ भूखंडाशी ओढूनताणून संबंध जोडण्यात आल्याचे चुकीच्या मूल्यांकनामुळे समोर आले आहे. मुळात हे प्रकरण आरटीओचा एफएसआय झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील खुल्या िवक्रीच्या इमारतीवर वापरण्याचे आहे. पण, त्याला वेगळा रंग देऊन परिवहन िवभागाचा भूखंडच िवकासकाला िदल्याचे भासवण्यात आल्याचे यातून दिसते.

पाटलीपुत्र सोसायटीत संजय बर्वेंची सदनिका
एसीबीचे प्रमुख तपास अधिकारी व अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांची पाटलीपुत्र सोसायटीत सदनिका आहे. पाटलीपुत्र सोसायटीतील सभासदांसाठी महसूल िवभागाने ५५०० मीटरचा भूखंड िदला होता. या भूखंडातील काही भाग कामधेनू शाॅपिंग माॅलसाठी िवकण्यात आला. बर्वेंची दुसरी सदनिका आदर्शमध्ये आहे, हे िवशेष!