औरंगाबाद - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या ‘उत्सव’ पुरवणीतील मराठा क्रांती मोर्चाची खिल्ली उडवणारे एक व्यंगचित्र प्रकाशित झाले. त्यामुळे मराठा समाजाकडून शिवसेनेविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मराठा संघटनांनी व्यंगचित्रकार प्रभू देसाई आणि सामनाचे संपादक उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिस ठाणे आणि परभणीच्या नानल पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नेमकी कुणी दिली तक्रार
- या प्रकरणी औरंगाद आणि परभणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- परभणी येथे अॅड. विष्णू नवले यांनी तक्रार दिली.
खासदार जाधव, आमदार रायमूलकर आणि खेडेकर मातोश्रीवर
या प्रकारामुळे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शिवाय शिवसेनेच्या इतरही मराठा खासदार आणि आमदारांनी राजीनामे द्यावे, असे आवाहन केले जात आहे. परिणामी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार यांना बोलावणे पाठवले होते. त्या अनुषंगाने खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर हे मातोश्रीवर पोहोचले आहेत.
नेमके काय झाले...
- व्यंगचित्र छापल्याच्या निषेधार्थ बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह आमदार संजय रायमूलकर आणि आमदार शशिकांत खेडेकर यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्याच्या पोस्ट सोशल मीडियात फिरत आहेत.
- पण, कुण्याही खासदार आणि आमदाराने राजीनामा दिला नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.
- मात्र, खासदार जाधव यांनी राजीनामा दिल्याचे त्यांचे पुत्र ऋषिकेश यांनी सांगितले.
- शिवाय आमदार खेडेकर यांनीही राजीनामा दिल्याचे सांगितले.
पुढील स्लाइडवर वाचा, तातडीने बोलावली बैठक...