आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआयए कोर्टाने साध्वी प्रज्ञाला जामीन नाकारला, तपास यंत्रणेला फटकारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- २००८मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंगचा जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळला आहे. अर्जात साध्वीने आपल्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचा दावा केला होता. मात्र प्रथमदर्शनी साध्वीच्या विराेधात पुरेसे पुरावे असल्याचे मत नांेदवत विशेष न्यायालयाने जामीन फेटाळला.
महिनाभरापूर्वी एनआयएने साध्वीवर खटला चालवण्याइतपत पुरेसे पुरावे नसल्याने तिच्या जामिनावर हरकत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. आरोपपत्र राजकीय हेतूने प्रेरित असल्याने ते स्वीकारू नये, असा अर्ज निसार बिलाल या स्फोटपीडित व्यक्तीने केला होता.
स्पेशल काेर्टाचे मत
गुन्ह्यातीलदुचाकी साध्वीच्या नावावर असल्याने ती सहभाग नाकारू शकत नाही. कोणत्या साक्षीदाराचे म्हणणे ग्राह्य मानावे, याबाबत सध्या संभ्रम असताना तपासातल्या आधीच्या निष्कर्षावर कायम राहणे योग्य ठरेल. त्यामुळे या साक्षीपुराव्यांच्या कटात साध्वीचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...