आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने दिले उत्तर, पण माफी मागितली नाही,राष्ट्रीय राज्य महिला आयोगाची पुन्हा नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / नवी दिल्ली- बलात्काराबाबत वादग्रस्त वक्तव्य करून टीकेचा धनी बनलेल्या अभिनेता सलमान खानने राष्ट्रीय महिला आयोगाने बजावलेल्या नोटिसीला उत्तर दिले. मात्र, यात त्याने माफी मागितली नसल्याचे आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी सांगितले. दुसरीकडे राज्य महिला आयोगासमोरही तो हजर राहिला नाही. त्यामुळे राज्य महिला आयोगाने त्याला पुन्हा जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
‘सुलतान’ चित्रपटाचे चित्रीकरण केल्यानंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखे वाटत होते, असे वक्तव्य सलमानने केले होते. त्यानंतर त्याच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. त्याचे वडील सलीम यांनी याबाबत माफीही मागितली.
काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सलमानला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, दिलेल्या तारखेला तो हजर झाला नाही. त्यामुळे त्याला जुलै रोजी पुन्हा उत्तर देण्यासाठी सांगण्यात आले आहे. सलमानचे वकील म्हणाले, हे प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगापुढे सुरू आहे. त्यामुळे राज्य महिला आयोगासमोर सुनावणी घेण्याचे कारण नाही. मात्र, याबाबत दोन्ही सुनावणी घेण्याचा अधिकार महिला आयोगाला असल्याचे रहाटकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुढील सुनावणीसही सलमान हजर राहिल्यास त्या दिवशी योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रीय महिला आयोगाला दिलेल्या उत्तरात त्याने स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, माफीचा उल्लेख कुठेही केला नाही, असे कुमारमंगलम यांनी सांगितले.
अनुष्कासह सलमान करणार तृतीयपंथींच्या अल्बमचे प्रमाेशन
यशराज फिल्मने तयार केलेल्या तृतीयपंथीयांच्या संगीत अल्बमचे अभिनेता सलमान खान, अनुष्का शर्मा आणि पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान प्रमाेशन करणार आहेत. यशराज फिल्मने सहा तृतीयपंथीयांना घेऊन एका अल्बमची निर्मिती केली आहे. यात त्यांनी आपली गाणी गायली आहेत. या अल्बमचे लाँचिंग गुरुवारी करण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांचे प्रश्न समाजापुढे मांडण्याच्या उद्देशाने या अल्बमची निर्मिती करण्यात आल्याचे यशराजकडून सांगण्यात आले आहे. अल्बमचे प्रमोशन करण्यासाठी सलमान, अनुष्का आणि राहत यांनी होकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...