आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारकडे खडखडाट, भाजपकडे मात्र आमदार फोडण्यासाठी पैसे; संजय राऊत यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घाेषणा केली, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. सरकारकडे त्यासाठी पैसे नाहीत, मात्र त्याच वेळी अन्य पक्षाचे खासदार, आमदार फोडण्यासाठी भाजपकडे पैसे आहेत. अन्य पक्षांविरोधात फोडाफोडीची तक्रार करणाऱ्या भाजप खासदारांनी आता चंद्रकांत पाटीलप्रकरणी ईडीकडे चौकशीची मागणी करावी,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.  


कन्नड (जि. अाैरंगाबाद) येथील शिवसेना अामदार हर्षवर्धन जाधव यांनी अापल्याला बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपत येण्यासाठी पाच काेटींची अाॅफर दिल्याचा दावा केला अाहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, ‘सरकार व्यवस्थितपणे चालत असताना त्यांना (भाजपला) घोडेबाजार करण्याची गरज का वाटते? ज्या संबंधित मंत्र्यांची चौकशी सरकार करेल तेव्हा करेल, परंतु इतर पक्षांच्या संदर्भात भाजपचे जे खासदार आणि इतर नेते ईडीकडे चाैकशीची मागणी करतात, त्यांच्यासाठी हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत पाटील ही एक फिट केस आहे. त्यांनी आधी या संदर्भात तपास पूर्ण करावा. ईडी व  सीबीआयला पत्र लिहावे.’  

बातम्या आणखी आहेत...