आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांना दाखवले ब्रिटिश कंपनीच्या संचालकपदी, राष्ट्रवादीची इअाेडब्ल्यूकडे तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संंबंधनसताना लंडनमधील एसजीएफएक्स कंपनीच्या संचालकपदी शरद पवार यांचे अनधिकृतरीत्या नाव दाखवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, पवार यांचा कंपनीशी कसलाही संबंध नाही, कंपनी कुणाची आहे हेही माहीत नाही. पवारांचे नाव वापरून त्यांना अडकवण्याचा डाव असल्याची शंका आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सर्वेश नरेंद्र भारदे शहनाझ अश्रफ या दोघांनी खोटारडेपणाने पवारांचे नाव संचालक मंडळात वापरले. जानेवारी २०११ ते जून २०११ या काळात कंपनीच्या शेअर्सचे मूल्य ७० कोटींवरून चक्क लाख काेटींवर गेल्याचे दाखवले. कंपनीने पवार यांना १३ डिसेंबर २०१० मध्ये संचालक बनवले. जानेवारी २०११ मध्ये त्यांनी राजीनामा दिल्याचे दाखवले अाहे.