आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना देशातील सर्वोच्च मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. 
 
ठाण्यात आयोजित  सावरकर संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. ठाकरे म्हणाले, सावरकरांना भारतरत्न देण्याची आमची जुनीच मागणी आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांनीही याबाबत मागणी केली आहे. अंदमान-निकोबार येथे सावरकरांना इंग्रजांनी डांबून ठेवले होते. अंदमानच्या जेलची प्रतिकृती असलेले स्मारक मुंबईत  उभारावे.
 
हिंदूराष्ट्रासाठी सावरकरांनी दिलेल्या योगदानाची तरुणांना माहिती करून देण्याची गरज असल्याचे  ठाकरे यांनी या वेळी सांगितले. या  संमेलनाला सावरकर प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या संमेलनाच्या उद‌्घाटनप्रसंगीही शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदेंनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली हाेती.
बातम्या आणखी आहेत...