आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या शाळांत लैंगिक शिक्षणाचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- किशोरवयीन मुला- मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल, प्रसूती व प्रजनन संस्था, कुटुंब नियोजन अशा सर्व विषयांची माहिती देणारे लैंगिक शिक्षण यापुढे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने गुरुवारी घेतला.

सन २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मुंबई एड्स नियंत्रण कक्षाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विशेष सत्राद्वारे लैंगिक शिक्षण देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पंधरा वर्षांखालील मुलींच्या गर्भपाताची वाढती संख्या, अल्पवयीन मुलींवरील वाढते लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांतील किशोरवयीन विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण दिले जावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली होती. त्यानुसार ठराव गुरुवारी शिक्षण समितीमध्ये मान्य करण्यात आला आहे. लैंगिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास घडवणारे जीवन कौशल्यही शिकवले जाणार असल्याचे पालिकेने सांगितले.