आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला दुसऱ्याला मतदान करण्याची वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. पेडर राेड भागातील प्रभाग क्रमांक २१४ मध्ये पवारांसह त्यांचे जावई अभिजित सुळे व नात रेवती सुळे यांनी मतदान केले. मात्र, या वाॅर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारच नसल्याने पवार व सुळे कुटुंबीयांनी नेमके  कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले, याचीच दिवसभर चर्चा हाेती.  
 
वॉर्ड क्रमांक २१४ मधून शिवसेनेचे अरविंद बने, भाजपकडून अजय पाटील, काँग्रेसचे कौशिक शहा आणि मनसेचे धनराज नाईक रिंगणात आहेत.  ‘राष्ट्रवादी’ने या वाॅर्डमधून शेख अब्दुल सलाम जुम्मन यांना उमेदवारी दिली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज बाद ठरला. अशा परिस्थितीत मतदान करताना पवारांनी दुसऱ्या एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला पसंती दिली की नोटाचे बटण दाबले, याबाबत आडाखे बांधले जात आहेत.   
 
खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचे पहिलेच मतदान असल्याने खूप उत्साहाने ती महालक्ष्मी येथील मतदान केंद्रावर आली होती. विशेष म्हणजे पवार मतदानासाठी येणार असल्यामुळे प्रसार माध्यमांनी मोठी गर्दी केली होती. पवार हे पुणे जिल्ह्यातील बारामती येथून निवडणूक लढवत असत. अनेक वर्षे त्यांचे मतदानही बारामती तालुक्यातच केले. मात्र, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी त्यांनी वास्तव्याचा पत्ता बदलला अाणि मुंबईत मतदार म्हणून नाेंदणी केली. तेव्हापासून ते मुंबईतच मतहक्क बजावतात.  
बातम्या आणखी आहेत...