आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना सरस ठरेल, भाजपला फटका!, आगामी निवडणुकांबाबत शरद पवारांचे भाकीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांत िशवसेना सरस ठरेल व भाजपला फटके बसतील. सत्तेत असूनही सध्या िवरोधकांची जागा िशवसेनेने घेतलेली असून त्याचा फायदा त्यांना, असे भाकीत शरद पवार यांनी शनिवारी केले. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर सेना-भाजपातील मतभेद टोकाला जाऊन दोघे दूर होतील. त्यामुळे भाजपला १२३ आमदारांच्या जिवावर सरकार चालवणे कठीण जाईल, असे भविष्यही त्यांनी वर्तवले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात पवार यांना मुंबई महापालिका निवडणुुकीनंतर मध्यावधी होतील, असे ते म्हणाल्याची आठवण करून दिली असता ते म्हणाले, मी त्या अर्थाने बोललो नव्हतो. या निवडणुकीनंतर भाजप-सेनेतील फारकतीला सुरुवात होईल या अर्थाने मी बोललो होतो, आणि तसे िचत्र आता िदसायला लागले आहे. सत्तेत असूनही िशवसेना भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडताना िदसत नाही.’

विधानसभा निवडणुकीत पंचवीस वर्षांची युती मोडल्याचा अनुभव सेनेच्या गाठीशी असल्याने आता भाजपच्या मागे ते फरपटत जाणार नाहीत आणि म्हणून िशवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत िदले आहेत. भाजपचे नेते मात्र अजूनही युती होऊ शकते, पण सन्मानाने झाली पाहिजे, असे बाेलत आहेत.’
मराठा मोर्चाचा परिणाम इतक्यात सांगणे अशक्य
युती सरकारमध्ये भाजप हा मोठा पक्ष असल्याने आजमितीला या पक्षात राज्यभरातून अनेक पक्षांचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. मात्र, हे िचत्र नवे नाही. सत्तेचे फायदे घेण्यासाठी असे पक्षप्रवेश होतच असतात. भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वाटतात तेवढ्या सोप्या जाणार नाहीत. मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणाऱ्या या समाजाचा उद्रेक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाईल की नाही हे मी आताच सांगू शकणार नाही. हे िनवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, मराठा समाजात नाराजी आहे हे नक्की, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
रियाझ भाटीला ओळखत नाही
दाऊदचा िनकटवर्तीय गँगस्टर िरयाझ भाटीने लोकसभा व िवधानसभा िनवडणुकांमध्ये भाजपला मदत केल्याच्या आरोपावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित भाटीच्या मदतीने मंुबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार िनवडून आल्याचा आरोप आहे. याविषयी िरयाझ यास आपण ओळखत नसल्याचे पवार म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...