आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात किरकोळ घसरण; रिअल्टी शेअरमध्ये तेजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आशियाई शेअर बाजारातून सकारात्मक संकेत मिळाले असले तरी भारतीय शेअर बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आले. भारतीय बाजारात बुधवारी झालेल्या व्यवहारानंतर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १० अंकांच्या घसरणीसह २६६३३ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी २ अंकांच्या घसरणीसह ८१९० च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेले २४ शेअर तेजीसह बंद झाले, तर २७ शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात अाली.
  
मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप शेअरमध्ये ०.९० टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून निर्देशांक १२१९४ अंकाच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टीतील मिडकॅप ०.४९ टक्क्यांनी वाढून १४६८१ अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर मुंबई शेअर बाजारातील स्मॉलकॅप ०.४७ टक्क्यांनी वाढून १२३७२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. नव वर्ष तसेच नाताळाच्या सुट्यांनंतर सुरू झालेल्या अमेरिकी शेअर बाजारात तेजी नोंदवण्यात आली. अमेरिकी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक डाओ १०० अंकांच्या वाढीसह २० हजारांच्या जवळपास आला आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...