आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिन्नम्मांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई/ मुंबई - तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव दिल्लीहून चेन्नईला जाण्याऐवजी थेट मुंबईला परतल्यामुळे अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांच्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधीवर सोमवारी रात्री अनिश्चततेचे सावट पसरले. शशिकला यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यापूर्वी राज्यपाल विद्यासागर राव कायदेशीर सल्ला घेत असल्याच्या बातम्या असून ते सोमवारी रात्री मुंबईत दाखल झाल्याचे महाराष्ट्र राजभवनाच्या सूत्रांनी सांगितले.

शशिकलाविरुद्धच्या बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्याचा लवकर निकालाचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्यानंतर राज्यपाल नेमके काय नियोजन करत आहेत याबद्दल अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही. या खटल्यात शिक्षा झाली तर शशिकलांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. मुख्यमंत्री पनीरसेल्व्हम यांचा राजीनामा मंजूर झाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...